PCMC : शहरात 18 हजार 603 फेरीवाले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील पथ विक्रेता सर्वेक्षण (विद्यमान पथ विक्रेत्यांसह) सन 2022-23 पूर्ण करण्यात आलेले आहे. (PCMC)  1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत सर्वेक्षण झाले असून 10 जानेवारी अखेर महापालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण 18 हजार 603 इतके पथ विक्रेते (फेरीवाले) व्यवसाय करताना समक्ष जागेवर आढळलेले आहेत. 

Maval News : गाडीला कट मारल्यावरून दोन गटात हाणामारी

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 4 हजार 419, ‘ब’ 1 हजार 9396, ‘क’ 2 हजार 440, ‘ड’ 1 हजार 120 , ‘इ’ 1 हजार 832, ‘फ’ 2 हजार 948, ‘ग’ 1 हजार 662 आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 2 हजार 243 असे 18 हजार 603  फेरीवाल्यांची नोंद झाली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पथ विक्रेत्यांची (PCMC) प्राथमिक यादी शुक्रवारी (दि.31) प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्राथमिक यादी महापालिकेचे सर्व क्षेत्रिय कार्यालय व भूमि जिंदगी विभाग, 2 रा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत याठिकाणी प्रसिध्द करण्यात येणार आहे.  त्याचप्रमाणे ही यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

पथविक्रेत्यांना आवाहन
पथ विक्रेत्यांनी यादीमध्ये तपशील तपासणे. सर्वेक्षण होऊनही यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास त्याबाबत प्रभागामध्ये अर्ज करणे. अपूर्ण कागदपत्र असल्यास त्याची पुर्तता प्रभाग कार्यालयामध्ये तात्काळ करणे. जर सर्वेक्षण राहून गेले असल्याने यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास विहित नमुन्यात प्रभागामध्ये अर्ज सादर करणे. उपरोक्त बाबींची पूर्तता 2 मे 2023 दि. पर्यंत संबंधित क्षेत्रिय कार्यालयामध्ये करावी. (PCMC) मुदतीनंतर प्राप्त हरकतींचा, अर्जांचा कोणताही विचार केला जाणार नाही.  यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या ज्या पथ विक्रेत्यांनी कागदपत्र सादर केलेली नाहीत, अशा पथ विक्रेत्यांना जोपर्यंत कागदपत्रे सादर केली जाणार नाहीत तोपर्यंत संबंधितांची नोंदणी स्थगित ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.