PCMC : मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकेला मिळणार 32 कोटी

एमपीसी न्यूज – राज्य शासनाकडे एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारामुळे (PCMC) जमा होणारी रक्कम पिंपरी महापालिकेला देण्यात येते. सन 2015-16 ते सन 2021-22 पर्यंत थकीत असलेली 395 कोटी रुपयांची रक्कम राज्यातील 24 महापालिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेला 32 कोटी 97 रुपये देण्याचा निर्णय शासनाने जारी केला आहे. हा निधी पालिकेला मिळाल्याने विकास कामे करण्यास हातभार लागणार आहे.

 

Chakan News : महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटो, कांदा व वाटाण्याची विक्रमी आवक

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सदनिका, दुकान किंवा जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर एक टक्का या दराने अधिभार शुल्क आकारले जाते. ही रक्कम नोंदणी व मुद्रांक विभागाच्या मार्फत शासनाकडे जमा होते. शासनाकडे जमा झालेली ही रक्कम महापालिकेला विकासकामांसाठी दिली जाते.

 

मुद्रांक शुल्काची अधिभाराची रक्कम गेल्या सहा वर्षांपासून शासनाकडे थकीत होती. ही थकीत रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, याबाबतचा शासन निर्णय नगरविकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी जारी केला आहे. ही रक्कम वितरित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला देय असलेल्या विविध रकमेमधून कोणत्याही प्रकारची कपात न करता हे अनुदान पिंपरी महापालिकांना येत्या 31 मार्चपर्यंत देण्यात यावे, अशा सूचना (PCMC) शासनाने दिल्या आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.