Pimpri : कचरा सेवा शुल्क रद्द करा – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri) कचरा संकलनाच्या नावाखाली शहरवासीयांवर लावलेला उपयोगकर्ता शुल्क रद्द करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, कचरा संकलनाच्या नावाखाली संपूर्ण शहरातील मिळकतधारकांच्या घरपट्टी पत्रकामध्ये 2019-20 चा उपयोगकर्ता शुल्क थकबाकी म्हणून 540 रुपये मिळकतकराच्या बिलात ही रक्कम जमा केली आहे.  ती वसूल देखील केली जात आहे. तसेच दरवर्षीच्या कर मिळकत पत्रिकेमध्ये अशा प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार आहे हे, अन्यायकारक आहे.

Mahalunge : पेट्रोलचे पैसे न देता पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण

तत्काळ हा निर्णय रद्द करण्यात यावा. मुळातच अशा कोणत्याही प्रकारचा कचरा संकलनाचा नावाखाली उपयोगकर्ता शुल्क मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी सारख्या महापालिका घेत नाही.(Pimpri) मग आपल्या पिंपरी -चिंचवड महापालिकेस अशा प्रकारचा उपयोगकर्ता शुल्क घेण्याची एवढी घाई का..? शहरातील नागरिक कररूपातून लाखो रुपये कर पालिकेस भरतात, ते भरून सुद्धा त्यांना पालिका पुरेशा मुलभूत सोयी सुविधा देत नाही. तसेच प्रशासक राजवटीच्या नावाखाली विविध कर व शुल्काच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची लुट करीत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.