PCMC : महापालिकेच्या वतीने सुमारे दीड लाख गणेश मूर्ती व 182 टन निर्माल्य संकलित

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वतीने शहरातील विसर्जन विविध घाट, कृत्रिम विसर्जन कुंड याठिकाणी 1 लाख 46 हजार 386 इतक्या मुर्ती संकलित करण्यात आले आहेत. तर सुमारे 182 टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 8 हजार35 गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर सुमारे 21 टन निर्माल्य संकलन करण्यात आले आहे. तसेच ब क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 47 हजार 775 गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर 45 टन निर्माल्य संकलन करण्यात आले आहे.

क क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 18 हजार 80 गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर 36 टन निर्माल्य जमा झाले आहे. ड क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे15 हजार422 गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर19 टन निर्माल्य गोळा करण्यात आले.

Pimpri : कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जनास नागरिकांचा प्रतिसाद

इ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 18 हजार 500 गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर 14 टन निर्माल्य संकलन करण्यात आले. फ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 29 हजार 970 गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या असून सुमारे 14 टन निर्माल्य संकलन करण्यात आले.

ग क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 8 हजार 604 गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर 18 टन निर्माल्य संकलन करण्यात आले. ह क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 11 हजार 347 गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर 15 टन निर्माल्य संकलन करण्यात आले.

NCP : रोहित पवार यांच्या कारखान्यावरील कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटांवर कृत्रिम विसर्जन हौद, निर्माल्य कुंड, मूर्ती संकलन केंद्र (PCMC) अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. शहरातील विविध विसर्जन घाटांवर गणेश विसर्जन पार पडले. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला मंडळांनी प्राधान्य देत कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जित केल्या गेल्या.

बहुतांश मंडळांनी स्वयंसेवी संस्थांकडे विसर्जनासाठी मूर्तीदान करण्यावर भर दिला. गणपतीदान उपक्रमाला देखील उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांनी सर्व प्रमुख विसर्जन घाटांची पाहणी करुन अधिकारी कर्मचा-यांना विविध सूचना दिल्या. क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली सर्व विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

जीवरक्षक, अग्निशमन दल, सुरक्षा दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक, आरोग्य पथक, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह यंत्रणा याठिकाणी तैनात करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.