Pimpri: महापालिका अतिरिक्त आयुक्त साहेबराव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

सात दिवसांपूर्वी झाली होती महापालिकेत बदली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त साहेबराव गायकवाड यांचे आज (गुरुवारी) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने पुण्यात निधन झाले आहे. ते 52 वर्षाचे होते.  त्यांची 30 एप्रिल रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारीपदावरुन पिंपरी महापालिकेत अतिरिक्त (अप्पर) आयुक्त म्हणून बदली झाली होती. महापालिकेत ते रुजूही झाले नव्हते. 

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गायकवाड अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. सात दिवसांपूर्वी  पिंपरी महापालिकेतील अप्पर आयुक्त या रिक्त पदावर गायकवाड यांची बदली झाली होती. त्यांनी पदभार देखील स्वीकारला नव्हता. आज पहाटे त्यांना हृदयविकाराच्या धक्का बसला. त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे निधन झाले आहे.

दरम्यान, गायकवाड आठ वर्षांपुर्वी पिंपरी महापालिकेत सहाय्यक आयुक्त होते. साधारण सहा वर्ष त्यांनी महापालिकेत काम केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.