Pimpri news: पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 1075 फूट भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन

एमपीसी न्यूज: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच सर्वात मोठी 1075 फूट भव्य तिरंगा पदयात्रा शुक्रवारी, ऑगस्ट 12 ला काढण्यात येणार आहे.(Pimpri News) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पिंपरी-चिंचवड महानगर ही पदयात्रा काढणार आहेत.

Divya Joshi: घरच नाही तर तिरंगा लावू कुठे ? तरुणीचा थेट मुख्यमंत्री व पंतप्रधानांना सवाल

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जन्म आणि संस्था यांचे विशेष सहकार्य यासाठी लाभेल.”मॉडर्न शाळा व कॉलेज, शिवभूमी कॉलेज यांचे 1000 ते 1,500 विद्यार्थी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अनेक कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होतील. हे सर्वजण 1075 फूट लांबीचा अखंड तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढतील. “ही पदयात्रा सकाळी 8:00 वा च्या सुमारास भक्ती शक्ती चौक येथून निघेल. (Pimpri News) तेथून ती टिळक चौक, दुर्गा नगर चौक व यमुना नगर पोलीस चौकी कॉर्नर मार्गे शनी मंदिराजवळील श्रीराम चौक येथे ती संपेल. अशी माहिती संभाजी शेंडगे महानगर मंत्री, पिंपरी चिंचवड शहर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.