Theatre Reopen : शहरातील नाट्यगृहांचा पडदा शुक्रवारपासून उघडणार

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विविध निर्बंध शिथील केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यगृहांचा पडदा शुक्रवारपासून उघडणार आहे. तसेच बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणा-या इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.

राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह उघडण्यास तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह शुक्रवार पासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठीची नियमावली राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जाहीर केली आहे.

मुख्य म्हणजे, केंटन्मेंट झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणीच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनीही पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यगृहे शुक्रवारपासून उघडण्यास परवानगी दिली आहे. बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणा-या इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात आली आहे.

काय आहे नाट्यगृह आणि चित्रपटगृहांसाठी नियमावली – 

  • प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी नाही.
  • कलाकार, कर्मचारी वृंद यांनी नियमितपणे तपासणी करावी.
  • मास्क, सॅनिटायजरचा वापर आवश्यक.
  • प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव.
  • केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई किटस परिधान करावे.
  • आरोग्यसेतू अ‍ॅप बंधनकारक.
  • कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
  • 50 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही.
  • आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.