PCMC News : रस्त्यावर राहणा-या लोकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पदपथ अथवा रस्त्यावर राहणा-या लोकांकरिता आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्विक हिल फाऊ॑डेशनमार्फत सीएसआर निधीतून महानगरपालिकेस रुग्णवाहिका देण्यात आली आहे.(PCMC News) महानगरपालिकेचे सावली निवारा केंद्र चालवणा-या रिअल लाईफ रिअल पीपल या सामाजिक संस्थेकडे आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकेचे हस्तांतरण आज (गुरुवारी) करण्यात आले.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे,क्षयरोग कक्ष प्रमुख डॉ. अंजली ढोणे, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, कर्मचारी महासंघाचे नंदकुमार इंदलकर, चारुशीला जोशी, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे, सीएसआर कक्ष समन्वयक विजय बावरे, क्विक हिल फाऊ॑डेशनच्या संचालिका अनुपमा काटकर  रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे मोहम्मद हुसेन, आग्नेस फ्रान्सिस यांच्यासह सावली निवारा केंद्रात वास्तव्य करणारे नागरिक उपस्थित होते.

Thergaon News : पवना नदीतील मृत मासे सडू लागल्याने विल्हेवाट लावण्याची थेरगाव सोशल फाउंडेशनची मागणी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे बेघरांसाठी सावली निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी बेघरांना विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. एप्रिल 2022 पासून आजपर्यंत या केंद्राद्वारे 406 बेघर लोकांना लाभ देण्यात आला आहे.(PCMC News) यापैकी सध्या 57 लोक निवारा केंद्रात राहत असून उर्वरित 349 लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये आढळून येणा-या बेघरांच्या आरोग्य सेवेसाठी समर्पित रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फिरत्या आरोग्य यानरुपी रुग्णवाहिकेद्वारे शहरातील बेघरांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

सावली निवारा केंद्रात सध्या वास्तव्यास असलेल्या प्रतिनिधींसमवेत आयुक शेखर सिंह यांनी  यावेळी संवाद साधला. आयुष्याच्या उतरत्या काळात बेघर होण्याची वेळ आली,(PCMC News) त्यामुळे अनेक संकटे आणि भीती यांचा सामना करावा लागला. अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेला हात जगण्याची नवी उमेद देणारा ठरला. निवारा केंद्रात मिळत असलेल्या चांगल्या सेवेमुळे समाजातील माणुसकी जीवंत असल्याचा सुखद अनुभव मिळत आहे, अशी भावना वयोवृद्ध मालन बनसोडे यांनी व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सावली निवारा केंद्राच्या माध्यामतून गरजू लोकांना होणारा फायदा या उपक्रमाचे मुख्य उद्दीष्ट साध्य करणारा आहे. या केंद्रामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी आवश्यक सेवा देण्यावर महानगरपालिकेचा भर देत आहे. त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहावे याकरिता बेघरांसाठी आरोग्य यानरुपी समर्पित रुग्णवाहिकेचा आरोग्य तपासणी उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.