Andra Project: आंद्रा प्रकल्पाचे काम 24 ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल; प्रशासनाचा दावा

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या आंद्रा  प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या 24 ऑगस्टपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल. वीज जोडणी करुन प्रकल्प कार्यान्वयीत होईल. (Andra Project) त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जलशुद्धीकरण केंद्रांतील पाण्याचे टेस्टिंग’  करण्यात येईल. त्यानंतर सप्टेंबरअखेर अर्थात घटस्थापनेच्या मुहुर्तावर पिंपरी-चिंचवडकरांच्या दारात आंद्रा धरणातील शुद्ध पाणी येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आंद्रा प्रकल्पांतर्गत निघोजे आणि तळवडे येथील इंद्रायणी नदीजवळ उपसा केंद्र या ठिकाणी पंपिंग मशिनरी उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी 22 केव्ही उच्चदाब क्षमतेची वीजजोडणी करण्याचे काम 24 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.(Andra Project) त्यानंतर नदीजवळ उपसा करुन पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल. तसेच, चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम येत्या 20 दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर पाण्याचे टेस्टिंग सुरू होईल. सर्व तापासणी केल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शुद्ध पाणी पुरवठा शहराला होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

Bibwewadi Police: बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीला केले तडीपार

पिंपरी-चिंचवडकर पाण्यासाठी स्वयंपूर्ण होतील

सध्यस्थितीला पिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणातून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे पवना धरणाव्यतिरिक्त शहरासाठी पाणी पुरवठ्याचे अन्य स्त्रोत निर्माण करणे गरजेचे होते. तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक निर्णय घेतला. आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेडमधून 167 एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवड देण्याच्या कोट्याला मुदतवाढ दिली.(Andra Project) कोविड आणि लॉकडाउनच्या परिणामामुळे नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यात प्रशासनाला अडचणी आल्या. अखेर सर्व अडचणींवर मात करीत प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकर आता पाण्यासाठी स्वयंपूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.