Pimpri: निसर्ग चक्रीवादळ! नागरिकांनो घरातच राहा, महापालिकेचे आवाहन

महापालिका आपत्ती विभाग सज्ज. PCMC appeals citizens to remain indoors during the Cyclone Nisarga landfall.

एमपीसी न्यूज – निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. शहरातील कोणत्याही भागातून कॉल आल्यास या गाड्या तातडीने तेथे मदतीसाठी पोहचणार आहेत. वरिष्ठ अधिकारी रात्रभर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते, अशी माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ओमप्रकाश बहिवाल यांनी दिली.

निसर्ग चक्रीवादळ ताशी 110 किलोमीटर वेगाने कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. याचा फटका शहरालाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळी वाऱ्यासह मुसळदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे पुरसदृश्य परस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. तरी, जोराच्या वाऱ्यामुळे झाडे पडणे, घरावरील पत्रे उडून जाणे, भिंत कोसळणे असे प्रकार घडू शकतात.

त्यामुळे नागरिकांनी घरातच राहणे सुरक्षित आहे. तसेच झाड पडी किंवा इतर काही प्रकार घडल्यास तातडीने नियंत्रण कक्षाला कळवावे, असे बहिवाल यांनी सांगितले आहे. अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रात्री परिस्थितीचा आढावा घेतला. प्रभाग अधिका-यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.