Pimpri News : ‘ताउक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याचे पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – चक्रीवादळात अनेकदा झाडे, होर्डिंग, मोबाईल टॉवर्स पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे  ‘ताउक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात असलेले जाहिरात फलक, होर्डिंग्ज, मोबाईल व विद्युत टॉवर्स, उंच झाडे, जंबो कोविड सेंटर्स इत्यादीबाबत सर्व संबंधित विभाग आणि सर्व क्षेत्रिय कार्यालये यांनी ‘ताउक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घ्यावी, असे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे.

ताउक्ते चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले आहे. केरळ, कर्नाटक राज्यात या चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. हे चक्रीवादळ 16 मे रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून काही किलोमीटरच्या अंतरावरून जाणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यात देखील वादळ सुटण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.