Pimpri : पीएमपीएमएलला साडेसात कोटी संचलन तूट देण्यास स्थायीची मान्यता

एमपीसी न्यूज –  पुणे परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) साडेसात कोटी रुपये संचलन तूट देण्यास आणि शहरातील विविध विकास कामांसाठी येणा-या 83 कोटी 70  लाख रूपये आज (बुधवारी) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते. स्मार्ट सिटी कार्यालय विकसित करणेकामी येणाऱ्या सुमारे 2 कोटी 36  लाख रुपये, महापालिकेच्या सन 2019-20  चे अंदाजपत्रकात पीएमपीएमल निधी या लेखशिर्षावर  190.83  कोटी तरतूद करण्यात आली असून त्यातील अंदाजित संचलन तुटीचे लेखापरिक्षण होऊन तूट कायम होईपर्यत ऑगस्ट 2019  मध्ये अदा करावयाचे असल्याने येणाऱ्या सुमारे 7 कोटी 50 लाख खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी येथील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या भागातील पूलाची दुरुस्ती करणेकामी येणा-या सुमारे 2 कोटी 11 लाख 10 हजार रूपये खर्चास,  बोपखेल गणेशनगर सीएमई भिंतीच्याकडेचा 12 मीटरचा रस्ता विकसित करणेकामी येणाऱ्या सुमारे 1 कोटी 49  लाख 37  हजार रुपये, मोशी येथील मोशी जाधववाडी शिवेवरील विकास योजना आराखड्यातील 24  मीटर डीपीचा रस्ता विकसीत करणेकामी येणा-या सुमारे 25 लाख रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.२ मधील पाणी पुरवठा / जलनि:सारण / विद्युत विभाग तसेच रस्ते खोदकाम परवानगी दिलेल्या सेवा वाहिन्याचे चर बुजविणेकामी येणा-या सुमारे 53 लाख रूपयांच्या खर्चास,  भक्तीशक्ती येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस स्थानकामध्ये चार्जिंग पॉईंटसाठी विद्युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे 1 कोटी 34  लाख 56  हजार रुपये,  प्रभाग क्रमांक 16 येथे 24 मीटर व ईतर रस्ते विकसित करणेकामी येणाऱ्या सुमारे 29  लाख 38 हजार खर्चासबैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करणेसाठी येणा-या 30 लाख 46 हजार रूपयांच्या खर्चास,  वायसीएम रुग्णालयातील विभागाकरीता, नविन आयसीयु व नवीन भोसरी रूग्णालयातील आयसीयु करीता आवश्यक असलेली 17 नग व्हेंटीलेटर खरेदीकरणेकामी येणा-या सुमारे 2 कोटी 63 लाख 50 हजार आणि 1 कोटी 12  लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

वायसीएम रुग्णालयातील नविन आयसीयु व नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यु. विभागाकरिता आवश्यक असलेली 35 नग पोर्टेबल प्लस ऑक्सीमीटर खरेदीकरणेकामी येणा-या सुमारे 26 लाख 87  हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. वायसीएम रुग्णालयातील नविन आयसीयु व नवीन भोसरी रूग्णालयातील आयसीयु विभागाकरिता आवश्यक असलेली 68  नग सीरींज पंप खरेदीकरणेकामी येणाऱ्या सुमारे 1 कोटी 19 लाख रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.