PCMC : प्रशासकांचा धमाका; 350 कोटींच्या कामांना मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) प्रशासक शेखर सिंह यांनी आठवड्यात दोन वेळा स्थायी समितीची बैठक घेत तब्बल 350 कोटींच्या कामांना मान्यता दिली. महापालिकेत 13 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहेत. आयुक्त शेखर सिंह हेच प्रशासक म्हणून कारभार हाकत आहेत. लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी विकास कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे.

या आठवड्यात दाेन वेळा स्थायी समितीच्या मॅरेथाॅन बैठका घेतल्या आहेत. त्यात 300 कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे.

पुढील कामांना मान्यता – 

पिंपरी चाैक ते हॅरिस पूल दापाेडी अर्बन स्ट्रिट डिझाईननुसार रस्ता विकसित करणे 109 काेटी 37 लाख, पिंपरी चाैक ते भक्ती-शक्ती चाैक निगडीपर्यंत अर्बन स्ट्रिट डिझाईननुसार विकसित करणे- 59 काेटी 6 लाख., माेशीतील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शंभू सृष्टी उभारणे- 15 काेटी., पाणी मीटरच्या नाेंदी, देयके देण्यासाठीच्या 33 काेटींच्या विषयाला मंजुरी., मुकाई चाैक ते चिखली स्पाईन राेड विकसित करणे- 14 काेटी 6 लाख., भक्ती-शक्ती ते मुकाई चाैक बीआरटी मार्ग विकसित करणे-17 काेटी 34 लाख., अग्निशमन विभागासाठी 160 नग पर्सनल फायर प्राेटेक्शन खरेदीसाठी 5 काेटी 20 लाख., पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी 45 लाख., महापालिका मुख्य इमारतीमधील अंतर्गत व बाह्य दैनंदिन स्वच्छतेसह आदी कामांसाठी 68 लाख., थेरगाव रूग्णालयातील विविध कामासाठी 2 काेटी 38 लाख., थेरगावमध्ये बहुउद्देशीय इमारत बांधणे- 73 लाख., चिखलीत (PCMC) एसटीपी टाकी परिसरातील देखभाल दुरूस्ती- 1 काेटी 10 लाख.,पीएमपीएमएलसाठी विविध पाससाठी- 4 काेटी 29 लाख.,दिव्यांग भवन फाऊंडेशन कंपनी संचलनासाठी- 2 काेटी., थेरगाव, जिजामाता रूग्णालयसाठी सी आर्म मशीन खरेदीसाठी 1 काेटी 65 लाख., मासूळकर नेत्र रूग्णालयासाठी मशीन खरेदी करणे 55 लाख.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.