PCMC Breaking News : महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची बदली; शेखर सिंह नवे आयुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC Breaking News) महापालिकेचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची अखेर आज (मंगळवारी) बदली झाली आहे. त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली. दरम्यान, सत्ताबदल होताच पाटील यांची बदली होणार असल्याचे पहिले वृत्त एमपीसी न्यूजने दिले होते.

ओडिशा केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी 15 फेब्रुवारी 2021 रोजी नियुक्ती झाली. पाटील प्रतिनियुक्तीने 5 वर्षासाठी महाराष्ट्रात आले आहेत. पाटील यांची महापालिकेतील अल्प कारकिर्द विविध कारणांनी वादग्रस्त ठरले होते.

Rajesh Patil : सांस्कृतिक संचित जपणे हे आपले नैतिक कर्तव्य – राजेश पाटील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.