PCMC : महापालिकेचा हजार  8676 कोटींचा अर्थसंकल्प सादर; करवाढ, दरवाढ नाही

एमपीसी न्यूज – ‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2024-25- या आर्थिक ( PCMC ) वर्षांचा मूळ 5 हजार  841 कोटी 96  लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत ( PCMC ) योजनांसह 8  हजार 676 कोटी 80 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज (मंगळवारी) सादर झाला. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आलेली नाही.

विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला. प्रशासकांनी अर्थसंकल्पाला  तात्काळ मान्यता दिली. महापालिकेचा हा 42 वा अर्थसंकल्प आहे. तर, आयुक्त सिंह यांचा दुसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप  उपस्थित ( PCMC ) होते.

Maratha reservation: मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

अर्थसंकल्पात काय आहे?

महापालिकेच्या विकास कामासाठी 1863 कोटी तरतूद
स्थापत्य विशेष योजनांसाठी 1031 कोटी
शहरी गरिबांसाठी 1898 कोटी
महिलांच्या विविध योजनांसाठी 61 कोटी
दिव्यांग कल्याकणारी योजना 65 कोटी
पाणीपुरवठा 269 कोटी
भूसंपादनाकरिता 100 कोटी रुपयांची तरतूद आहे
अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेसाठी 10 कोटी
अमृत 2 योजनेसाठी 30 कोटीआठ क्षेत्रीय कार्यालयासाठी 190 कोटी निधी

अ क्षेत्रीय कार्यालय 23.26 कोटी.
ब क्षेत्रीय कार्यालय 11.76 कोटी.
क क्षेत्रीय कार्यालय 21.66 कोटी.
ड क्षेत्रीय कार्यालय 38.43 कोटी.
इ क्षेत्रीय कार्यालय 13.02 कोटी.
फ क्षेत्रीय कार्यालय – 35.25 कोटी.
ग क्षेत्रीय कार्यालय 16.51 कोटी.
ह क्षेत्रीय कार्यालय 23.07 कोटी

पायाभूत सुविधा प्रकल्प
शहरातील विकास योजनेतील सुमारे 61 कि.मी. लांबीचे रस्ते विकसित करण्यात येणार ( PCMC ) आहेत. त्यातील काही रस्ते डांबरीकरण, काही रस्ते कॉक्रीटीकरण तर काही रस्ते Urban Street Design नुसार विकसित करण्याचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. महापालिका हद्दीमधील वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर, चिखली, जाधववाडी, बो-हाडेवाडी, मोशी , च-होली, तळवडे, दिघी, डुडुळगाव, वडमुखवाडी, कुदळवाडी या भागातील रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये रस्त्यासोबतच पाणीपुरवठा, जलनिःसारण नलिका टाकणे, विद्युत दिव्यांची व्यवस्था करणे युटीलिटी डक्ट टाकणे इ. सोई सुविधा देणेत येणार आहेत.

अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ते विकसित करणार

महत्वाचे रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करणेत येणार आहे. यामध्ये पादचा-यांसाठी सुसज्ज समपातळीतील पदपथ, सायकल स्वारांकरीता सुरक्षित सायकल मार्ग, नागरीकांना बसणेकरीता बैठक व्यवस्था, दिशादर्शक फलक इ. गोष्टींचा समावेश करणेत आलेला आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी ते हॅरीस पुल, दापोडी- लांबी 6.70 कि.मी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी ते भक्ती शक्ती चौक, निगडी- लांबी 6.40 कि.मी, बिर्ला हॉस्पीटल चौक ते डांगे चौक-लांबी 1.65  कि.मी, कुणाल आयकॉन रस्ता, पिंपळेसौदागर-लांबी 1.78 कि.मी, आकुर्डी गुरुद्वारा चौक ते राजयोग कॉलनी- लांबी 0.8 कि.मी, वाकड येथील दत्तमंदिर रस्ता लांबी 1.76  कि.मी

सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प

महापालिका हद्दीतील चिंचवड येथील आरक्षण क्रमांक 181 ड बिजनेस सेंटर साठी आरक्षित जागेत ( PCMC ) संकल्पना करा, बांधा, अर्थ पुरवठा करा, चालवा आणि हस्तांतरित करा (DBFOT) यातत्वावर सिटी सेंटर विकसित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये रिटेल्स , हॉटेल्स , सर्व्हीस अपार्टमेंट, शॉपिंग सेंटर विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शहराचे नाव लौकिकात भर पडण्यास मदत होणार आहे. मोशी स्टेडियम :- मोशी येथील सर्व्हे नं.435 येथे 2500 आसन क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे शहरातील क्रीडा सुविधामध्ये मोठी भर पडणार आहे. कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे क्लब निर्माण करण्याच्या उद्देशाने BOT तत्त्वावर अण्णासाहेब मगर स्टेडियमचे विकास करणेचे नियोजित आहे.

पुल बांधणे

मुळा नदीवरील सांगवी-बोपोडी पुल बांधण्यात येणार आहे. या 18.00 मीटर रुंदीच्या पुलामुळे सांगवी व पुणे महापालिका हद्दीतील बोपोडी या भागातील नागरिकांचे दळण वळण सोयीचे होणार असून त्यामुळे इंधन व वेळेची बचत होणार
आहे. पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वेवरील उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे. पुलामुळे पुणे मुंबई रस्त्यावरुन पिंपरी गाव, पिंपळे सौदागर तसेच वाकड, हिंजवडी या भागात जाणेकरीता नागरीकांना विना अडथळा जवळचा मार्ग उपलब्ध होणार असुन वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सबवे बांधण्यात येणार आहे.  किवळे रस्त्यावरील रक्षक चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असून रस्ता ओलांडणे धोकादायक झाले आहे. या ठिकाणी अंडरपास बांधल्यानंतर होणा-या वाहतुक कोंडीचे नियंत्रण होऊन पादचा-यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडणेस मदत होणार आहे. मामुर्डी सांगवडे पवना नदीवर पुल बांधण्यात येणार आहे. मामुर्डी क्षेत्रामधून PMRDA क्षेत्रातील सांगवडे गावात पोहचणेस सुलभ होणार आहे. तसेच नवीन पुलाचे बांधकाम केल्यानंतर वाहतुक सुरळीत होऊन सुरक्षित प्रवास होणार आहे.

हरीत सेतु प्रकल्प

शहराने विनावाहन वापर धोरण स्वीकारलेले आहे. त्याअनुषंगाने शहराचा हरीत सेतु मास्टर प्लॅन तयार करणे व त्यासंबधी प्रथम Pilot Neighbourhood हरीत सेतु प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत सलंग्न, विना व्यत्यय, समपातळीत, सुयोग्य, सावली युक्त पदपथ व सायकल मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे. हरीत सेतु प्रकल्पामुळे नागरीकांना सहजपणे जवळचा कमी अंतराचा प्रवास पायी चालणे किंवा सायकल चालवून सुरक्षितपणे करता येईल. यामुळे नागरीकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. यासाठी महापालिका हिश्याच्या रक्कमेची तरतूद करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प पुढील 10 वर्षाचे कालवधीत संपूर्ण शहरामध्ये टप्याटप्याने राबविण्याचे धोरण आहे.

आकुर्डीत वारकरी भवन

आकुर्डी गावठाणातील पै. पांडुरंग काळभोर सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर वारकरी भवन उभारण्याचे नियोजन ( PCMC ) आहे. या भवनामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणा-या वारक-यांची निवासाची सोय होणार आहे.

मैलाशुद्धीकरण प्रकल्प

अमृत 1.0 योजने अंतर्गत पिंपळे निलख येथे 15 द.ल.लि, चिखली येथे 12 द.ल.लि. व बोपखेल येथे 5 द.ल.लि. क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्रे बांधण्याचे नियोजन आहे. अमृत 2.0 योजने अंतर्गत भोसरी येथे 5 द.ल.लि., वाल्हेकरवाडी येथे 4 द.ल.लि. व केशवनगर येथे 4 द.ल.लि. क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्रे बांधण्याची कामे तसेच कस्पटेवस्ती, चिखली येथे संप व पंप हाऊस बांधणे आणि काळेवाडी पंप हाऊस ते भाटनागर STP पर्यंत पाईपलाईन टाकणे ही कामे कार्यन्वित असून या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे. ताथवडे येथे पशुसंवर्धन विभागाच्या जागेमध्ये 20 द.ल.लि. क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र बांधणेचे काम नियोजित आहे. प्रकल्पांना केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे.शहरामधून वाहणा-या इंद्रायणी, पवना व मुळा या नद्यांचे होणारे प्रदुषण कमी होणार आहे.

थेरगावात कॅन्सर रुग्णालय

थेरगाव रुग्णालयाच्या जवळ नव्याने कॅन्सर रुग्णालय PPP तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. 60 बेडचे कॅन्सर या आजरासाठी सर्व सेवा उपलब्ध असणारे रुग्णालय सुरु केले जाणार आहे.  Chemotherapy, Radiotherapy, PET Scan ई. सेवा PPP तत्वाव सुरु करण्यात येणार ( PCMC ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.