PCMC : महानगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक, युद्धनीती, राजनिती निपुण असे जगातील आदर्श लोककल्याणकारी राजे होते, शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांनी वाचन केले पाहिजे, त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन (PCMC) आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आयुक्त शेखर सिंह यांच्या  हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सर्वाना शिवजयंती निमित्त शुभेच्छा देताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते.

मुख्य प्रशासकीय कार्यालयातील कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, (PCMC) जनसंपर्क विभागाचे प्रमुख पुराणिक, वाहनचालक संघटनेचे राजेश जाधव आदी उपस्थित होते.

Pune News : सहा गडांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करणार ; शिवनेरी, राजगड, तोरणा ‘या’ गडांचा समावेश

यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी तेथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीच्या आवारातील तसेच भक्ती-शक्ती चौक निगडी, डांगे चौक, लांडेवाडी भोसरी या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी त्यांच्या समवेत उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, सुचिता पानसरे, शितल वाकडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.विविध ठिकाणच्या कार्यक्रमास भक्ती-शक्ती माजी नगरसदस्य मारुती भापकर,सचिन चिखले, प्रकाश जाधव,सतीश काळे, धनाजी येळकर पाटील,जीवन बोराडे,सागर तापकीर, नकुल भोईर,राणेश दाहिभाते, ज्ञानदेव लोभे,राजेंद्र देवकर, (PCMC) गणेश सरकटे,गणेश भांडवलकर,सचिन आल्हाट,राजू पवार,सुरज ठाकर, संतोष वाघ,अभिषेक म्हसे,निलेश शिंदे, जालींदर खतकर,कल्पना गिड्डे,दादासाहेब पाटील,कुणाल कांबळे,स्वप्नील शिंदे,दत्तात्रय शिंदे,विनायक जगताप,वैभव फाळके,शहश कानेकर,श्रेयश कानेकर,अनिकेत रसाळ,भावेश काचा,नकूल भोईर, सुरेंद्र पासलकर, सर्जेराव जुनवणे, तात्याबा माने, संजय रवेंगरे, संतोष ढोरे, सुनीत थोरात आदी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले असून त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.