Pimpri: शहरातील नालेसफाई 95 टक्के पूर्ण; आयुक्तांची माहिती

pcmc claims to have cleaned 95% nallas in the city till date. काही मोठी कामे चालू आहेत. ती लवकरच पूर्ण केली जातील, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच मागील वर्षी ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले होते. त्याठिकाणचे नाले देखील पूर्ववत करुन घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने यंदा लवकरच नालेसाफसफाईचे काम हाती घेतले होते. शहरातील नालेसफाई जवळपास 95 टक्के पूर्ण झाली आहे. काही मोठी कामे चालू आहेत. ती लवकरच पूर्ण केली जातील, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच मागील वर्षी ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले होते. त्याठिकाणचे नाले देखील पूर्ववत करुन घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात छोटे – मोठे मिळून 152 नाले आहेत. त्यामध्ये ‘अ’ प्रभागात 25, ‘ब’ 13, ‘क’ 33, ‘ड’ 12, ‘ई’ 21, ‘फ’ 15, ‘ग’ 9 आणि ‘ह’ प्रभागात 24 नाले आहेत. महापालिकेच्या वतीने बांधलेल्या नाल्यांची (बांधीव नाले) वर्षभर साफसफाई केली जाते.

उर्वरित नाल्यांची पावसाळ्याच्या अगोदर साफसाफई केली जाते. महापालिकेकडून पावसाळ्यापुर्वी शहरातील नालेसफाईची कामे केली जातात. दरवर्षी मे महिन्यात साफसाफई केली जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नाल्यांची साफसाफई मोहिम एप्रिलपासूनच सुरु केली होती. शहरातील नालेसफाई 95 टक्के पुर्ण झाली आहे.

जवळपास 95 टक्के काम पूर्ण, मोठी कामे चालू – आयुक्त

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा शहरातील नालेसफाईचे काम लवकरच हाती घेतले होते. जवळपास 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. काही मोठी कामे चालू आहेत. पावसाला अद्याप सुरुवात झाली नाही. हा वादळी पाऊस आहे. पावसाळ्यात कोठेही पाणी साचू नये, नाले तुंबू नयेत याची सर्व कामे केली जात आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचत होते. त्या ठिकाणी कामे सुरु आहेत. मागीलवर्षी भोसरीतील आदिनाथनगरमध्ये पाणी साचले होते.

अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे संपूर्ण नाला रस्ता फोडून घेतला आहे. सर्व कामे केली आहेत. ‘सीआयआरटी’च्या मदतीने यावर्षी आदिनाथनगर मध्ये काही अडचण होणार नाही याची दक्षता घेत आहोत. मोशीतील नाला देखील पूर्ववत करुन घेतला जात आहे. त्याचे पाईप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यावर्षी मोशीत देखील पाणी साचणार नाही. ज्या ठिकाणी पाणी साचते. अशा सर्वच ठिकाणीच्या समस्या सोडवित आहोत”.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरात 152 नाले आहेत. शहरातील नाल्यांची 95 टक्के साफसफाई झाली आहे. फुलेनगराचा नाला साफ करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास संपूर्ण नाल्यांची सफाई झाली आहे. फक्त काही नाल्यांचे काही भाग राहिले आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.