PCMC cleanliness drive : पिंपरी-चिंचवड मनपा अंतर्गत क क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम 

एमपीसी न्यूज : 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत क क्षेत्रीय कार्यालयामध्ये सकाळी 8 ते 10 पर्यंत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.(PCMC cleanliness drive) महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम, प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती, कचरा विलगीकरणास प्रबोधन करुन स्वच्छता उपक्रमात सेवाभावी संस्था, शालेय विद्यार्थी, नागरिकांना सहभागी करुन स्वच्छता मोहिम घेण्यात आली. सदर कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली.

 

सदर उपक्रमात अर्चना मोरे (आसरा सोशल फाऊंडेशन) यांचे स्वच्छता विषयक व्याख्याने, अण्णा बोदडे (क्षेत्रीय अधिकारी) यांनी स्वच्छते विषयक व प्लॅस्टिक बंदी विषयक तसेच कचरा विलगीकरणाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थितीतांना आपले पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवणेस सहकार्य करावे असे आवाहन केले. सदर उपक्रमात उत्कृष्ट काम करणा-या आरोग्य निरिक्षक, सफाई कामगारांचा तसेच मनपास सहकार्य करणा-या विविध सेवाभावी संस्थाचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Khadi exhibition : दुर्गा ब्रिगेड संघटना आणि जनता खादी भांडार यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रदर्शनाचे आयोजन

सदर उपक्रमामध्ये अण्णा बोदडे (क्षेत्रीय अधिकारी), तानाजी दाते (सहा. आरोग्याधिकारी), मा. राजेंद्र उजिनवाल (मुख्य आरोग्य निरीक्षक), आरोग्य निरीक्षक श्री. संजय मानमोडे, क्षितीज रोकडे, शैलेश वाघमारे, श्री. सुखदेव वायाळ (मुख्याध्यापक – जाधववाडी मनपा शाळा), स्वाती निकम (मुख्याध्यापिका नेहरुनगर मनपा शाळा), छाया शिंदे (वैद्यकिय अधिकारी – नेहरुनगर दवाखाना), अर्चना मोरे (आसरा सोशल फाऊंडेशन), कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन, सुरेश चौधरी (व्यापारी संघटना) तसेच मनपा अधिकारी आणि कर्मचारी तसेच तीनशेहुन अधिक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सदर कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.