PCMC: लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेल्या लिपिकाला महापालिका सेवेतून निलंबित

एमपीसी न्यूज  – पाणी पुरवठा विभागातील एका ठेकेदाराला (PCMC) मंजूर निविदेच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी 1 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेल्या लिपिकाला महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

दिलीप आडे असे महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा व जलनिःसारण विभागात दिलीप भावसिंग आडे हा अनुरेखक (लिपिक) या पदावर काम करत होता. आडे याने एका ठेकेदाराला मंजूर निविदेच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी 1 लाख 5 हजार रूपयांची लाच मागितली.

तडजोडीअंती 1 लाखांची रोकड घेताना आडेला 21 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालिकेत रंगेहाथ पकडले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे.

Paytm : आता ट्रेन तिकिट रद्द केल्यावर मिळणार 100 टक्के परतावा; पेटीएमकडून ‘कॅन्सल प्रोटेक्ट’ सुविधा

त्यानंतर शुक्रवारी आडेला पालिका सेवेतून निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश (PCMC) आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. या आदेशाची आडेच्या सेवा नोंद पुस्तकात नोंदही करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.