Pimpri News : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पालिकेचे युट्युब, फेसबुक लाईव्ह किती जणांनी पाहिले; पालिकेकडे माहिती उपलब्ध नाही

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने युटूयुब आणि फेसबुक या सोशल मीडियावरून लाईव्ह कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. मात्र या कार्यक्रमाचा किती दर्शकांनी लाभ घेतला याबाबत पालिकेकडे माहिती उपलब्ध नाही, ही बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे माहिती अधिकारातून माहिती मागवली होती. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठेवलेल्या प्रक्षेपणाला किती खर्च करण्यात आला. याबाबतचा तपशील नाईक यांनी मागवला होता. त्याबाबत माहिती देताना पालिकेकडून काही टीव्ही चॅनेलची माहिती देण्यात आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने निवडक न्यूज चॅनेलला प्रसारणाचे हक्क दिले. त्यावेळी आर्थिक बाब म्हणून विचार करता अन्य चॅनेल बाबत दरपत्रक, निविदा, कोटेशन काहीही मागवण्यात आले नाही. यावेळी रोटेशन पद्धत वैगेरे काही नव्हती.”

महापालिकेच्या फेसबुक पेज लाईव्हला एकूण किती जणांनी किती वेळ पाहिले, याची कोणतीही माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. ही माहिती नसेल तर हा कार्यक्रम कुणासाठी केला हा प्रश्न निर्माण होतो आहे, असेही नाईक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.