PCMC: शहरातील सीबीएससी शाळांच्या माहितीचे संकलन सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सीबीएसीच्या एका शाळेला बोगस प्रमाणपत्र दिल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाल्याने महापालिकेचा शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. त्यामुळे शहरातील 46 शाळांचे मान्यतेसंदर्भात कागदपत्रांची माहितीचे शिक्षण विभागाच्या वतीने संकलन ( PCMC) करण्यात येत आहे. संपूर्ण माहिती आल्यानंतर शिक्षण उपसंचालकांना ही माहिती पाठविली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

आकुर्डीतील सीबीएससी मान्यता असलेल्या एका शाळेच्या संस्था चालकाने वाढीव वर्गासाठी शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. त्यानुसार संबंधित शाळेला वाढीव वर्गाचे प्रमाणपत्र मिळाले. मात्र, हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आल्याने शहरातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र देणारी शहरात टोळी तर सक्रीय नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Pune News : महाराष्ट्रात अंनिस वर बंदी घाला – प्रदिप नाईक

शहरात सद्यस्थितीत सीबीएससीच्या मान्यताप्राप्त 46 शाळा आहेत. तशी पालिकेच्या शिक्षण विभागाकडे नोंदही आहे. मात्र, बोगस प्रमाणपत्राचे प्रकरण समोर आल्यानंतर पालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व मान्यता प्राप्त असलेल्या शाळांची सर्व कागदपत्रे तपासणी व माहिती संकलनांची मोहीम सुरू ( PCMC) केली. सर्व शाळांची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण उपसंचालकांना ही माहिती पाठविली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.