Pimpri: कोरोनाच्या आपत्तीत महापालिका आयुक्तांचा बढत्यांचा धमाका!

PCMC commissioner issues promotion orders to few PCMC engineers amid lockdown pandemic, शहर, दोन सहशहर अभियंत्यांसह 8 कार्यकारी अभियंत्यांना बढत्या

एमपीसी न्यूज – एकीकडे पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना दुसरीकडे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मात्र ‘क्रीम पोस्ट’ वरील बढत्यांचा धमाका उडवून दिला आहे. शहर अभियंता, दोन सहशहर अभियंता, आठ कार्यकारी अभियंत्यांना एकाचदिवशी बढत्या देत आयुक्तांनी आपल्या नावावर नवा विक्रम केला आहे.  

दरम्यान, आयुक्त हर्डीकर यांचा महापालिकेतील तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली होण्याची शक्यता असतानाच त्यांनी बढत्या दिल्याने त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

महापालिका कारभारातील सर्वांत महत्वाच्या  शहर अभियंतापदावर राजन पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे स्थापत्य मुख्यालय, ‘अ’,’ब’,’क’,’ई’,’फ’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालये, याशिवाय उद्यान स्थापत्य विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  श्रीकांत सवणे आणि रामदास तांबे यांना सहशहर अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे.

सवणे यांच्याकडे बीआरटीएससह विशेष प्रकल्प तर तांबे यांच्याकडे पाणीपुरवठा – जलनिस्सा:रण विभाग, पर्यावरण विभाग सोपवण्यिात आला आहे. तर, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम, नियंत्रण विभाग सोपविण्यात आला आहे.

त्याचबरोबर विजयकुमार काळे, शिरीष पोरेडी, अजय सुर्यवंशी, सुनील भागवानी, सुनील वाघुंडे, अनिल शिंदे, आबासाहेब ढवळे आणि रामनाथ टकले यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. त्यांना नव्याने नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

काळे यांच्याकडे जलनि:सारण ‘क’, ‘इ’, ‘फ’, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, पोरेडी ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, सुर्यवंशी पाणीपुरवठा प्रकल्प, भागवानी, ढवळे यांच्याकडे बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, वाघुंडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, स्थापत्य (उद्यान), शिंदे जलनि:सारण अ,ब,ड,ग क्षेत्रीय कार्यालय आणि  टकले यांच्याकडे ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाची नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे.

याखेरीज कार्यकारी अभियंता पी.आर.पुजारी यांच्याकडे पंतप्रधान आवास योजना, डी.आर जुंधारे यांच्याकडे पाणीपुरवठा विभाग, प्रशांत पाटील यांच्याकडे ‘ब’ क्षेत्रीय स्थापत्य विभाग, एस.एन.इंगळे यांच्याकडे बीआरटीएस विभाग आणि पी.एस.ओंभासे यांच्याकडे बीआरटीएस परिवहन कक्ष या विभागाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.