Pimpri: कोरोनासोबत जगावे लागणार; आयुक्त हर्डीकरांचा फेसबुक लाईव्हद्वारे संवाद

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू पूर्णपणे जाणार नाही. अद्यापपर्यंत त्यावर लस मिळाली नाही. तोपर्यंत कोरोना जाणार नाही. त्यामुळे आता आपल्याला कोरोनासमवेत जगावे लागणार आहे, असे पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांनी शंभरी पार केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘संवाद नागरिकांशी, लढा कोरोनाशी’ या उपक्रमाअंतर्गत आयुक्त श्रावण हर्डीकर आज (मंगळवारी) फेसबुक लाईव्हद्वारे शहरवासीयांसोबत संवाद साधत आहेत.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर परदेशातून आलेल्या प्रत्येकाचे होम क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे कोरोनाची शहरात वाढ रोखणे शक्य झाले. मात्र, एप्रिल
अखेरीस शहरातील रुग्ण संख्या वाढत आहे. शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांनी आजच शंभरी पार केली आहे.

कोरोनाची कोणतीच लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हा विषाणू जास्त धोकादायक आहे. आपण त्याच्या प्रसाराचा वेग कमी करू शकतो. 100 मधील 80 टक्के बाधित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्ण कसे म्हणावे असा प्रश्न पडत आहे.
धडधकाट दिसणा-या तरुण, तरुणींनी कोरोनाची लागण होत आहे. त्यांना त्रास होणार नाही. परंतु, या व्यक्ती विषाणूच्या वाहक असू शकतात. त्यांच्या माध्यमातून इतरांना बाधा होवू शकतो. कोरोना विषाणू शत्रु आहे. हा शत्रु गणिमी काव्याचा वापर करतो. त्याचा योग्य प्रतिकार करणे आपल्या हातात आहे. खवखव, श्वासाला त्रास, सर्दी खोकला ही कोरोनाची लक्षणे आहेत.
आयुक्त श्रावण हर्डीकर पुढील चार दिवस फेसबुक लाईव्ह मार्फत नागरिकांशी संवाद साधणार आहेत