PCMC :  महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सक्षम; माता मृत्यू प्रमाणात घट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) वैद्यकीय यंत्रणा सक्षम होत असल्याने प्रसुतीदरम्यान मातांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होत आहे. शहरात गेल्या पाच वर्षांत एक लाख 51 हजार 903 महिलांची प्रसुती झाली. त्यात प्रसुती दरम्यान 113 मातांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण केवळ 0.07 टक्के आहे.

गरोदर महिला, नवजात शिशू आणि प्रसूत माता यांचा मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष्य योजना सुरू केली. त्या अंतर्गत महापालिकेच्या रूग्णालयातील प्रसुतीगृह गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम राबवण्यात येतो. रूग्णालयातील प्रसुतीकक्ष आणि प्रसुती शस्त्रक्रिया विभागात दिल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता सुधारणे, प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीनंतर स्त्रीला सन्मानपूर्वक, उच्च दर्जाची मातृत्व काळजी देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Monsoon Update : 20 ऑगस्टपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे

लक्ष्य उपक्रमाअंतर्गत पालिकेच्या (PCMC) सर्व रूग्णालयात गरोदर मातांची विशेष काळजी घेतली जाते. तसेच खासगी रूग्णालयातही योग्य प्रकारे काळजी घेण्याबाबत पालिकेचा वैद्यकीय विभाग सातत्याने आवाहन करत असतो. त्यामुळे शहरात 2018 ते 31 मार्च 2023 या पाच वर्षांच्या कालावधीत एक लाख 51 हजार 903 महिलांची प्रसुती झाली. त्यातील 113 मातांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

चार रुग्णालयांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र

लक्ष्य योजनेचे निकष पूर्ण केल्यामुळे महापालिकेच्या चार रुग्णालयांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यात भोसरी रुग्णालयातील प्रसुतीकक्ष आणि प्रसुती शस्त्रक्रिया विभाग, नवीन थेरगांव रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (तालेरा) रुग्णालय आणि नवीन जिजामाता रुग्णालयाचा समावेश आहे.

महापालिकेच्या (PCMC) रूग्णालयात गरोदर महिलांना उच्च दर्जाच्या सुविधा दिल्या जातात. ग्रामीण भागातील गरोदर महिलांना शेवटच्या टप्प्यात महापालिका रूग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे गुंतागुंत होऊन मातेचा मृत्यू होतो. मातेचा मृत्यू कशाने झाला, का झाला, याचे सात जणांच्या समितीमार्फत परीक्षण केले जाते, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.