PCMC : मिरवणूक मार्गावरील कामे वेळेत पूर्ण करा; आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून 11 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आवश्यक सर्व सेवा सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला दिले.मिरवणूक मार्गावर महापालिकेचे चालू असलेले काम (PCMC)वेळेत पूर्ण करावेत. विशेषतः पिंपरी येथील उड्डाण पुलाचे काम आणि वाकड येथील रस्त्यांचे काम यावर लक्ष केंद्रित करावे अशी सूचनाही त्यांनी केली.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वानिमित्त   महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये  महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत महापालिका आणि पोलीस प्रशासन यांची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सह शहर अभियंता संजय खाबडे, प्रमोद ओंभासे,

 

मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, उप आयुक्त सुभाष इंगळे, रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता थॉमस नरोन्हा, शशिकांत मोरे, नितीन देशमुख, दिलीप धुमाळ, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सुचिता पानसरे, विजयकुमार थोरात,  विशेष अधिकारी किरण गायकवाड, उप अभियंता विजय कांबळे,  चंद्रकांत कुंभार, अशोक कुटे, लक्ष्मीकांत कोल्हे, बाणाईचे प्रकाश दामोदरे, पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, भोजराज मिसाळ, अर्जुन पवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे आदी उपस्थित होते.

 

Nigdi Crime News : हसल्याच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने वार

आयुक्त शेखर सिंह म्हणाले,  विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिका दरवर्षी विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करत असते. यावर्षी देखील असे कार्यक्रम होणार आहेत. सर्व  कार्यक्रम  आनंदाच्या वातावरणात आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी महापालिका चांगले नियोजन करणार आहे.

 

शहरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी होत असते. त्यादृष्टीने महापालिकेने सर्व आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. मिरवणूक मार्गावर महापालिकेचे चालू असलेले काम वेळेत पूर्ण करावेत. विशेषतः पिंपरी येथील उड्डाण पुलाचे काम आणि वाकड येथील रस्त्यांचे काम यावर लक्ष केंद्रित करावे. पिंपरी आणि दापोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दरवर्षी  नागरिकांसाठी पालिकेकडून आवश्यक  सुविधा पुरवल्या जातात. येथे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि महापालिका प्रशासनाने समन्वयाने नियोजन करावे.

 

 

रोजगार मेळावा, रक्तदान शिबीर यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन तसेच  कार्यक्रमाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमरे, शौचालयाची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, मंडप व्यवस्था आदी बाबींची पूर्तता संबंधित विभागाने वेळेत पूर्ण कराव्यात, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिल्या.  पोलिसांच्या वतीने बैठकीत विविध सूचना मांडण्यात आल्या. बैठकीचे प्रास्ताविक उपायुक्त रविकिरण घोडके यांनी केले तर  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  विशेष अधिकारी किरण गायकवाड (PCMC) यांनी केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.