PCMC Crime News : निगडी, वाकड, तळेगाव आणि भोसरीत दारूबंदी अंतर्गत कारवाई, एकास अटक

एमपीसी न्यूज – दारूबंदी कायद्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड परिसरातील निगडी, वाकड, तळेगाव आणि भोसरीत कारवाई करण्यात आली. निगडी येथे सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 03) या कारवाया करण्यात आल्या. कारवाई दरम्यान अवैध दारू व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निगडी येथे सामाजिक सुरक्षा पथकाने केलेल्या कारवाईत गावठी दारू आणि रोख रक्कम असा 27 हजार 380 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोपट उत्तम आरसुळ (वय 57, रा. वेताळनगर, चिंचवड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. खंडोबा माळावरून पुढे जाणा-या रोडलगत ही कारवाई करण्यात आली.

तळेगाव एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 1 लाख 61 हजार किंमतीचे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी आवश्यक कच्चे रसायन जप्त केले. याप्रकरणी पुरूषोत्तम राठोड (वय 29, रा. कंजारभाट वस्ती, अंबी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेणूनगर, वाकड याठिकाणी वाकड पोलिसांनी कारवाई केली. याठिकाणाहून 60 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. सुगंधा संजय चव्हाण (वय 40, रा. वेणूनगर, वाकड) या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी एमआयडीसी परिसरात महात्मा फुलेनगर याठिकाणी केलेल्या कारवाईत देशी दारू जप्त करण्यात आली. रतिलाल भगवानदास पटेल (वय 51, रा.  महात्मा फुलेनगर, भोसरी) याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोशीतील प्रदर्शन मैदान याठिकाणी केलेल्या 10 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी कोकीळा प्यारेलाल कंजारभाट (वय 40, रा. बो-हाडेवाडी, मोशी) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.