PCMC Crime News : चाकण, भोसरी परिसरातून सोळा वर्षीय दोन मुलींचे अपहरण

एमपीसी न्यूज – चाकण व भोसरी परिसरातून सोळा वर्षीय दोन मुलींचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि.16) या दोन्ही घटना घडल्या.

पहिली घटना संतोष नगर, वाकी बुद्रुक (ता. खेड) याठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी महिलेच्या 16 वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे.

_MPC_DIR_MPU_II

दुसरी घटना बालाजीनगर, भोसरी याठिकाणी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सोळा वर्षीय मुलीच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अविनाश तात्या पवार (वय 20, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या सोळा वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.