PCMC Crime News : वाहन चोरीचे सत्र कधी थांबणार? आजही दुचाकी चोरीच्या पाच घटना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या वाहन चोरीचे सत्र वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी शहरातून सात दुचाकी आणि एक ट्रक चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आज देखील शहराच्या विविध भागातून पाच दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शहरातील वाहन चोरीचे सत्र कधी थांबणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

इंद्रायणी घाट, दिघी या ठिकाणावरून (एमएच 14/ जीके 4117) ही दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी सचिन कांताराम घुंडरे (वय 39, रा. च-होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

जीवन शाम बोरगे (वय 25, रा. पीसीएमसी चौक, भोसरी) यांची (एमएच 14/ सीआर 9885) ही दुचाकी चोरीला गेली असून त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 13 ते 14 ऑगस्ट दरम्यान हा भोसरीत हा प्रकार घडला.

चिंबळी फाटा, कुरळी येथून ऋषिकेश विलास तोत्रे (वय 23, रा. चिंबळी फाटा, कुरळी) यांची (एमएच 14/ सीई 6168) ही दुचाकी चोरीला गेली आहे. याप्रकरणी त्यांनी शिक्रवारी (दि.03) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय बजरंग लडकत (वय 48, रा. मोशी) यांची (एमएच 14/ बीयू 3553) ही दुचाकी नाशिक हायवे, मोशी चौक याठिकाणी लावलेली असताना चोरीला गेली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वारंगवाडी, मुळशी या ठिकाणाहून संतोष एकनाथ भेगडे (वय 47, रा. तळेगाव दाभाडे) यांची (एमएच 14/ ईजी 8824) ही दुचाकी चोरीला गेली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली असून तपास सुरू आहे.

मागील दोन दिवसांत शहरात एकूण बारा दुचाकी चोरी आणि एक ट्रक चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. वाहन चोर चांगलेच मोकाट सुटले असून, त्यांच्या वेळीच मुसक्या आवळणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.