PCMC : अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सामाजिक एकोपा, सामंजस्य टिकविण्याचा निर्धार

एमपीसी न्यूज : – भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या (PCMC) पुण्यतिथी निमित्त त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. दहशतवाद, हिंसाचाराच्या विरोधात शपथ घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सामाजिक एकोपा,सामंजस्य आणि शांती टिकविण्याचा निर्धाराची शपथ अधिकारी, कर्मचा-यांनी घेतली.

Nigdi : निगडीतील सीएनजी पंपामुळे वाहतूक गॅसवर – शिवानंद चौगुले

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,  कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, नितीन समगीर, विजया कांबळे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा 21 मे पुण्यतिथी दिवस हा दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून सर्व शासकीय कार्यालयात अभिवादन करून तसेच दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेऊन पाळण्यात येतो.

त्यानुसार आज महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांनी देखील अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत “आम्ही,भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी, दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची, गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करीत आहोत, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जीवित मुल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करू” अशी शपथ घेतली.शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी (PCMC) केले.

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share