PCMC : पिंपरी, भोसरीतील विकास कामे सुरु राहणार

एमपीसी न्यूज –  चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठीची आचारसंहिता 18 जानेवारीपासून सुरू असून ही आचारसंहिता फक्त चिंचवड विधानसभा मतदार संघापुरती मर्यादित आहे. त्यामुळे पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील विकास कामे करण्यात कोणतीही (PCMC) अडचण नाही. पिंपरी, भोसरीतील विकास कामे सुरु राहणार असल्याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह काढला आहे.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांमध्ये म्हणजे 18 जानेवारीला पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्च रोजी मतमोजणी आहे. 3 मार्चपर्यंत आचारसंहिता असणार आहे. आचारसंहिता कालावधीत मतदारांवर प्रभाव पडेल, असे कोणत्याही नवीन विकास कामांना मंजुरी देता येत नाही.

Pune News : झाडांची छाटणी करत असताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

चिंचवड विधानसभा मतदार संघापुरती आचारसंहिता लागू असताना पिंपरी, भोसरीतील विकास कामांवर याचा परिणाम झाला होता. त्यामुळे आयुक्तांनी स्वतंत्र काढला आहे. त्यात म्हटले आहे की, निवडणूक जाहीर झालेला मतदारसंघ राज्याची राजधानी, महानगरे, महापालिकामध्ये समाविष्ट असेल, तर आदर्श आचारसंहिता केवळ संबंधित मतदारसंघ क्षेत्रापूरती लागू राहील, असा नियम आहे. चिंचवड पोट निवडणुकीची प्रक्रिया (PCMC) पूर्ण होईपर्यत आदर्श आचारसंहितेचा अंमल चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्राच्या मर्यादेत राहणार आहे.

त्यामुळे पिंपरी व भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांच्या निविदा काढणे, निविदा स्वीकारणे व तत्सम बाबी, विकास कामांचे कार्यारंभ आदेश देणे, प्रस्तावित व चालू विकासकामे पूर्ण करण्याबाबत कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. मात्र, असे असले तरी एखादे विकास कामाबाबतच्या निविदा संपूर्ण महापालिका क्षेत्रास प्रभावित करीत असल्यास अशा कामांवर निर्बंध कायम राहतील, असेही आयुक्त सिंह (PCMC) यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.