PCMC : शहरातील आज आणि उद्याचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – पवना धरण येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड (PCMC)शहरातील आज संध्याकाळचा आणि उद्या सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

पवना धरण येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रावेत बंधारा येथे कमी प्रमाणात पाणी (PCMC)सोडण्यात आले आहे.

PCMC : पाणी साठवण व वितरण क्षमता वाढविण्याची कामे प्रगतीपथावर; 30 टाक्या व 70 किमीच्या मुख्य जलवाहिन्या

त्यामुळे आज गुरुवारी आणि उद्या शुक्रवारी सकाळी   पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी  उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून मनपास सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.