PCMC : आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे तर डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे ‘अतिरिक्त’ची जबाबदारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे (PCMC) यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काढले आहेत.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे रिक्त पद भरण्यासाठी 19 मे 2023 रोजी पदोन्नती समितीची बैठक झाली. शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवा ज्येष्ठतेनुसार, गोपनीय अहवाल, शिस्तभंग आणि मत्ता व दायित्वाची माहिती, संगणक अर्हता इत्यादी सेवाविषयक तपशील पडताळून सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदास वैद्यकीय विभागाचे विभागप्रमुख म्हणून घोषित केले आहे. डॉ. गोफणे यांच्या आस्थापना विषयक बाबी वैद्यकीय मुख्य कार्यालयाकडेच राहणार आहेत.

PCMC : शहरात आजही शेकडो होर्डिंग अनधिकृत, कारवाईचा केवळ दिखावूपणा – नाना काटे

महापालिका आस्थापनेवरील अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे पद (PCMC) रिक्त आहे. वैद्यकीय विषयक कामकाजाची आवश्यकता व निकड विचारात घेता या पदावर अधिकारी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. प्रशासकीय कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.