PCMC : डॉ. श्रीकर परदेशी यांचा एक फोन अन् दीड वर्षांपासून हेलपाटे मारणा-या महिलेला मिळाली नोकरी

एमपीसी न्यूज – कर्तव्यनिष्ठ अशी (PCMC ) ओळख असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि उपमुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून कार्यरत असलेले डॉ. श्रीकर परदेशी यांच्या एका फोनने दीड वर्षांपासून हेलपाटे मारणा-या महिलेला महापालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. डॉ. परदेशी यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधला अन्‌ केवळ चारच दिवसात महिलेला नोकरीची ऑर्डर मिळाली.

पूजा कृष्णाजी भोसले असे नियुक्ती मिळालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती कृष्णाजी भोसले हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात वाहनचालक या पदावर कार्यरत होते. त्यांचे 26 नोव्हेंबर 2021 रोजी निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वानुसार नियुक्ती मिळावी म्हणून त्यांची पत्नी पुजा  यांनी 17 जानेवारी 2022 रोजी अर्ज केला. दीड वर्षांपासून पाठपुरावा करुनही नोकरी मिळत नव्हती.

Maharashtra News : दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांनाही मिळणार दोन गणवेशांचा लाभ

कृष्णाजी भोसले पालिका सेवेत असताना तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होते. त्यामुळे दीड वर्षांपासून झगडूनही नोकरी मिळत नसल्याने अखेर पूजा भोसले यांनी डॉ. परदेशी यांच्याशी  संपर्क साधला. डॉ. परदेशी यांनी 15 मे 2023 रोजी आयुक्त शेखर सिंह यांना हा विषय सांगितले. त्यानंतर सिंह यांनी सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना भोसले यांच्या नियुक्तीसंदर्भात हालचाली करण्याच्या सूचना दिल्या. भोसले यांचा पोलीस पडताळणी, वैद्यकीय तपासणी करून तत्काळ अहवाल देण्यात आला. चौथ्या दिवशी म्हणजे 19 मे रोजी भोसले यांना महापालिकेत शिपाई या पदावर नियुक्ती देण्यात (PCMC ) आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.