रविवार, जानेवारी 29, 2023

E-waste :  पिंपरी-चिंचवडमध्ये प्रजासत्ताकदिनी ई-वेस्ट संकलन मोहीम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रजासत्ताकदिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी महापालिका आणि विविध संस्थांच्या वतीने ई-वेस्ट संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.(E-waste) सुमारे 150 संकलन केंद्रे उभारली जाणार आहेत. या केंद्रांवर ई-कचरा संकलित केला जाणार असल्याची माहिती महापालिका पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

गेल्या वर्षीपासून पूर्णम् इकोविजन, पर्यावरण संरक्षण संस्था, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि शहरातील सामाजिक संस्थाच्या माध्यमातून एकत्रितपणे ‘ई-यंत्रण’ ही मोहीम शहर स्तरावर राबविण्यात येते. यंदाही 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत ही मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये सुमारे 150 संकलन केंद्रे उभारली जाणार आहेत. या केंद्रांवर ई-कचरा संकलित केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांनी जास्तीत-जास्त संख्येने या मोहीमेला प्रतिसाद द्यावा.

नादुरुस्त झालेले फ्रिज, वॉशिंग मशिन, फॅन, मायक्रोवेव्ह, वातानुकुलित यंत्रे, सीडी-डीव्हीडी प्लेअर, होम थिएटर्स, संगणक, पेन ड्राइव्ह, हेड फोन्स, प्रिंटर्स, डिजिटल कॅमेरा, मोबाईल फोन, चार्जर, टीव्ही, लॅपटॉप, व्हिडीओ कॅमेरा अशा वस्तु स्वीकारल्या जातील. तर, ट्यूबलाईट, सीएफएल बल्ब्स, काच स्वीकारल्या जाणार नाहीत.

Pimpri News: ‘ जल्लोषावर विर्जन; आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना घेतले फैलावर

संकलित केलेल्या ई-कचऱ्याचे, वर्गीकरण केले जाईल. (E-waste) दुरुस्त होऊ शकणारे लॅपटॉप आणि कॉम्प्यूटर दुरुस्त करून गरजूंना दान केले जातील. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त लॅपटॉप आणि कॉम्प्यूटर दान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल.

उरलेला ई-कचरा आणि प्लास्टिक कचरा , शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे , नोंदणीकृत संस्थांना सुपूर्त केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

https://poornamecovision.org/events/mega-drives/eyantran-2023-pcmcs-largest-e-waste-collection-drive

Latest news
Related news