Pcmc Election 2022: वाकड प्रभाग सर्वांधिक मतदारांचा तर ताथवडे प्रभागात सर्वात कमी मतदार

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी (Pcmc Elecation 2022) प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी महापालिका निवडणूक शाखेने आज (गुरुवारी) प्रसिद्ध केली आहे. प्रभाग क्रमांक 38 वाकड, भुमकर, कस्पटेवस्ती मध्ये सर्वाधिक 52 हजार 648 मतदार आहेत. तर, सर्वात कमी प्रभाग क्रमांक 37 ताथवडे, पुनावळेमध्ये 21 हजार 102 मतदार आहेत. नागरिकांना 1 जुलैपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. स्वत: मतदाराला हरकत नोंदवावी लागणार आहे. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालये आणि मुख्यालयातील निवडणूक शाखेत कार्यालयीन वेळेत हरकती नोंदविता येतील.

याबाबतची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. उपजिल्हाधिकारी प्रशांत जोशी, उपायुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते. 31 मे 2022 अखेरपर्यंत विधानसभा मतदारयादीमध्ये नोंदी झालेल्या मतदारांची नावे घेतली आहेत. त्यानुसार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 5 लाख 86 हजार 849 मतदार आहेत. तर, भोसरी विधानसभा मतदारसंघात 5 लाख 27 हजार 799, पिंपरी विधानसभेत 3 लाख 76 हजार 470 आणि भोर विधानसभा मतदारसंघातील ताथवडेगावात 9 हजार 575 मतदार आहेत. एकूण 15 लाख 693 मतदार आहेत. त्यापैकी 12 हजार 564 वगळलेले म्हणजे स्थालांतरित किंवा मयत झालेले मतदार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीला 14 लाख 88 हजार 129 मतदारांना हक्क बजाविता येणार आहे. त्यात पुरुष 8 लाख 394, महिला 6 लाख 87 हजार 647 आणि इतर 88 मतदार आहेत. दरम्यान, 2017 च्या निवडणुकीपेक्षा 3 लाख मतदार वाढले आहेत.

अशी आहे प्रभागनिहाय मतदारसंख्या! – Pcmc Elecation 2022

1) तळवडे रुपीनगरमध्ये 19 हजार 970 पुरुष तर 15 हजार 44 महिला आणि 15 इतर असे एकूण 35 हजार 29 मतदार आहेत.
2) चिखलीगावठाण प्रभागात 18 हजार 221 पुरुष, 14 हजार 195 महिला तर इतर 3 असे एकूण 32 हजार 419 मतदार आहेत.
3) बो-हाडेवाडी, जाधववाडीत 25 हजार 370 पुरुष, 20 हजार 834 महिला, इतर 2 असे एकूण 46 हजार 206 मतदार आहेत.
4) मोशीगावठाण, डुडुळगावमध्ये 12 हजार 438 पुरुष, 10 हजार 517 महिला, इतर 2 असे 22 हजार 957 मतदार आहेत.
5) च-होली, चोविसावाडीत 19 हजार 30 पुरुष, 16 हजार 670 महिला, इतर 5 असे 35 हजार 705 मतदार आहेत.
6) दिघी, बोपखेलमध्ये 19 हजार 126 पुरुष, 16 हजार 599 महिला, इतर 1 असे 35 हजार 726 मतदार आहेत.
7) सँण्डविक कॉलनी, रामनगरमध्ये 13 हजार 412 पुरुष तर 10 हजार 681 महिला असे 24 हजार 93 मतदार आहेत.
8) भोसरी गावठाण, गवळीनगरमध्ये 20 हजार 164 पुरुष तर 16 हजार 307 महिला असे 36 हजार 471 मतदार आहेत.
9) धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत प्रभागात 19 हजार 419 पुरुष, 13 हजार 802 महिला, इतर 3 असे 33 हजार 224 मतदार आहेत.
10) इंद्रायणीनगर, लांडेवाडी प्रभागात 19 हजार 350 पुरुष, 15 हजार 288 महिला, इतर 1 असे 34 हजार 639 मतदार आहेत.
11) गवळीमाथा, बालाजीनगरमध्ये 12 हजार 792 पुरुष, 10 हजार 577 महिला असे 23 हजार 369 मतदार आहेत.
12) घरकुल, नेवाळे, हरगुडे वस्तीत 13 हजार 969 पुरुष, 10 हजार 486 महिला, इतर 2 असे 24 हजार 457 मतदार आहेत.
13) मोरेवस्ती, म्हेत्रेवस्तीत 20 हजार 62 पुरुष, 16 हजार 55 महिला, इतर 2 असे 36 हजार 119 मतदार आहेत.
14) यमुनानगर, फुलेनगर प्रभागात 16 हजार 294 पुरुष, 13 हजार 984 महिला, इतर 1 असे 30 हजार 279 मतदार आहेत.
15) संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगरमध्ये 15 हजार 598 पुरुष तर 14 हजार 53 महिला असे 29 हजार 651 मतदार आहेत.
16) नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगरमध्ये 15 हजार 185 पुरुष, 13 हजार 317 महिला, इतर 2 असे 28 हजार 504 मतदार आहेत.
17) वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगरमध्ये 12 हजार 319 पुरुष तर 10 हजार 702 महिला असे 23 हजार 21 मतदार आहेत.
18) मोरवाडी, एम्पायर इस्टेट, खराळवाडी, अजमेरात 19 हजार 883 पुरुष, 17 हजार 903 महिला, इतर 1 असे 37 हजार 787 मतदार आहेत.
19) चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, आनंदनगरमध्ये 16 हजार 181 पुरुष तर  14 हजार 298 महिला असे 30 हजार 479 मतदार आहेत.
20) काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, अजंठानगरमध्ये 18 हजार 339 पुरुष, 14 हजार 912 महिला, इतर 1 असे 33 हजार 252 मतदार आहेत.
21) आकुर्डीगावठाण, गंगानगर, दत्तवाडीत 18 हजार 380 पुरुष, 15 हजार 899 महिला, इतर 2 असे 34 हजार 281 मतदार आहेत.
22) ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगरमध्ये 17 हजार 159 पुरुष तर 15 हजार 406 महिला असे 32 हजार 565 मतदार आहेत.
23) वाहतूकनगरी, भक्ती-शक्ती, केंद्रीय वसाहतमध्ये 16 हजार 775 पुरुष, 16 हजार 4 महिला, इतर 1 असे 32 हजार 780 मतदार आहेत.
24)  मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेतमध्ये 27 हजार 342 पुरुष, 24 हजार 638 महिला, इतर 3 असे 51 हजार 983 मतदार आहेत.
25) वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्तीत 15 हजार 912 पुरुष, 13 हजार 524 महिला इतर 5 असे 29 हजार 441 मतदार आहेत.
26) बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगरमध्ये 14 हजार 529 पुरुष, 12 हजार 878 महिला, इतर 4 असे 27 हजार 411 मतदार आहेत.
27) चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्कमध्ये 17 हजार 412 पुरुष, 16 हजार 164 महिला, इतर 1 असे 33 हजार 577 मतदार आहेत.
28) केशनगर, यशोपुरम,श्रीधरनगरमध्ये 19 हजार 130 पुरुष, 17 हजार 910 महिला, इतर 1 असे 37 हजार 41 मतदार आहेत.
29) भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्पमध्ये 19 हजार 34 पुरुष, 17 हजार 307 महिला, इतर 2 असे 36 हजार 343 मतदार आहेत.
30) पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभनगरमध्ये 18 हजार 522 पुरुष, 17 हजार 239 महिला, इतर 2 असे 35 हजार 763 मतदार आहेत.
31) काळेवाडी, विजयनगर, नढेनगरमध्ये 14 हजार 733 पुरुष, 12 हजार 686 महिला, इतर 1 असे 27 हजार 420 मतदार आहेत.
32) तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगरमध्ये 17 हजार 57 पुरुष तर 14 हजार 447 महिला असे 31 हजार 504 मतदार आहेत.
33) रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगरमध्ये 12 हजार 396 पुरुष तर 10 हजार 754 महिला असे 23 हजार 147 मतदार आहेत.
34) बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनीत 11 हजार 555 पुरुष तर 9 हजार 631 महिला असे 21 हजार 186 मतदार आहेत.
35) थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगरमध्ये 13 हजार 306 पुरुष, 11 हजार 86 महिला, इतर 2 असे 24 हजार 394 मतदार आहेत.
36) गणेशनगर, संतोषनगर, पद्मजीपेपर मिल प्रभागात 16 हजार 905 पुरुष, 14 हजार 245 महिला, इतर 2 असे 31 हजार 152 मतदार आहेत.
37) ताथवडे, पुनावळे, काळाखडकमध्ये पुरुष 11 हजार 791 तर 9311 महिला असे 21 हजार 102 सर्वात कमी मतदार आहेत.
38) वाकड, भुमकर, कस्पटे, वाकडकरवस्तीत 29 हजार 37 पुरुष, 23 हजार 604 महिला, इतर 7 असे 52 हजार 648 सर्वाधिक मतदार आहेत.
39) पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईनमध्ये 16 हजार 257 पुरुष, 14 हजार 488 महिला, इतर 5 असे 30 हजार 750 मतदार आहेत.
40) पिंपळेसौदागर, कुणाल आयकॉन, प्लॅनेट मिलेनियममध्ये 21 हजार 967 पुरुष तर 18 हजार 976 महिला असे 40 हजार 943 मतदार आहेत.
41) पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैद्युवस्तीत 20 हजार 519 पुरुष, 18 हजार 731 महिला, इतर 2 असे 39 हजार 252 मतदार आहेत.
42) कासारवाडी, फुगेवाडीत 17 हजार 175 पुरुष तर 15 हजार 335 महिला असे 32 हजार 510 मतदार आहेत.
43) दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगरमध्ये 20 हजार 101 पुरुष, 18 हजार 603 महिला, इतर 5 असे 38 हजार 709 मतदार आहेत.
44) पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्कमध्ये 11 हजार 289 पुरुष, 10 हजार 364 महिला, इतर 1 असे 21 हजार 654 मतदार आहेत.
45) नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगरमध्ये 14 हजार 387 पुरुष, 12 हजार 921 महिला, इतर 1 असे 27 हजार 309 मतदार आहेत.
46) जुनी सांगवी, ममतानगर, शितोळेनगर या चारसदस्यीय प्रभागात 20 हजार 605 पुरुष आणि 19 हजार 272 महिला असे 39 हजार 877 मतदार आहेत.  एकूण पुरुष मतदार 8 लाख 394, महिला मतदार 6 लाख 87 हजार 647, इतर 88 असे 14 लाख 88 हजार 129 मतदार आहेत.

PCMC : सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या संस्थेला महापालिका तीन लाख देणार

निवडणूक शाखेचे प्रमुख बाळासाहेब खांडेकर म्हणाले, ”प्रारुप मतदार यादीवर 1 जुलैपर्यंत हरकती नोंदविता येतील. भौगोलिक दृष्ट्या नाव योग्य प्रभागात आहे का, नावात काही चुक, विधानसभा यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे अशा हरकती घेता येतील. स्वत: मतदाराला हरकत नोंदवावी लागणार आहे. विधानसभा यादीत नाव आहे आणि महापालिका यादीत नाव नसल्याबाबच्या मतदारांचा शोध घेतला जाईल. स्थळ पाहणी करुन योग्य कार्यवाही केली जाईल. 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.