PCMC Election 2022: महापालिकेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC Election 2022) महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची तीन सदस्यीय पद्धतीची अंतिम प्रभाग रचना आज (शुक्रवारी) महापालिका निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहे. महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालयात अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे.  2, 3, 5, 7, 11, 12, 26, 27 या आठ प्रभागात काही बदल झाले आहेत. पाच हजारापर्यंत लोकसंख्येत वाढ, घट झाली आहे.  

महापालिका प्रशासनाने 2022 च्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली. 3 सदस्यांचे 45 आणि 4 सदस्यांचा 1 प्रभाग केला. त्यातून 139 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यानुसार  प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला. 28 जानेवारी 2022 रोजी त्याला आयोगाने मान्यता दिली. प्रारुप प्रभाग रचना 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध केली.  प्रारुप प्रभाग रचनेवर 1  ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या.  एकूण 6 हजार 400 हरकती प्राप्त झाल्या होत्या.

Load Shedding in Maharashtra : राज्यात भारनियमन नाहीच : नितीन राऊत यांचे स्पष्टीकरण

या हरकती व सूचनांवर राज्य निवडणूक आयोगाने (PCMC Election 2022) नियुक्त केलेलेप्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांनी 26 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली. सुनावणीनंतर कवडे यांच्या शिफारशी नमूद केलेला अहवाल महापालिकेमार्फत राज्य निवडणूक आयोगास 5 मार्च 2022 पर्यंत सादर करण्यात आला. हरकतींवरुन महापालिकेने पाठविल्यानुसार 2, 3, 5, 7, 11, 12, 26, 27 या प्रभागात बदल करण्यात आले. हरकती सोडून आयोगाने स्वत: काही प्रभागात बदल केले. बदल केलेल्या अंतिम आराखड्याला आयोगाने गुरुवारी (दि.12) मान्यता दिली. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आज अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे. बदल केलेल्या प्रभागात पाच हजारापर्यंत लोकसंख्येत वाढ, घट झाली आहे.

PCMC Election 2022

‘या’ आठ प्रभागात बदल

1. प्रभाग क्रमांक 2 – चिखलीगावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी (पूर्वीची लोकसंख्या 33 हजार 653 होती, आता 32 हजार 161) असणार आहे.

2. प्रभाग क्रमांक 3 – बो-हाडेवाडी, जाधववाडी ( पूर्वी लोकसंख्या 37 हजार 671 होती, आता 36 हजार 718) असणार आहे.

3. प्रभाग क्रमांक 5 – च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी (पूर्वी लोकसंख्या  39 हजार 970 होती. आता 34 हजार 816) असणार आहे.

4. प्रभाग क्रमांक 7 – सँण्डविक कॉलनी, रामनगर (पूर्वी लोकसंख्या  37 हजार 97 होती. आता 42 हजार 251) असणार आहे.

5.प्रभाग क्रमांक 11 – गवळीमाथा, बालाजीनगर (पूर्वी लोकसंख्या  37 हजार 360 होती. आता 38 हजार 313) असणार आहे.

6. प्रभाग क्रमांक 12 – घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती (पूर्वी लोकसंख्या  34 हजार 418 होती. आता 35 हजार 910) असणार आहे.

7. प्रभाग क्रमांक 26 – बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर (पूर्वी लोकसंख्या  37 हजार 420 होती. आता 39 हजार 600) असणार आहे.

8. प्रभाग क्रमांक 27 – चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह  (पूर्वी लोकसंख्या  38 हजार 727 होती. आता 36 हजार 547) असणार आहे. े

याबाबत बोलताना निवडणूक विभाहाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले, ”आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिली. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. आता आरक्षण सोडत, मतदार यादी विभाजनबाबात आयोगाकडून सूचना येतील. त्यानुसार पुढील कार्यक्रम राबविला जाईल”.

https://www.youtube.com/watch?v=MEsfxbEdzsQ&t=1s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.