Pcmc Election 2022 …बघा कसे पडलेय आरक्षण!

एमपीसी न्यूज  – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी/ ओबीसीं)करिता 37 आणि सर्वसाधारण महिलांच्या 38 जागांसाठी आज (शुक्रवारी) आरक्षण सोडत काढण्यात आली.  यामध्ये काही दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांची संधी गेली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 46 प्रभाग आहेत. तर, नगरसेवकसंख्या 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती (एससी) 11 पुरुष 11 महिला अशा 22, अनुसूचित जमाती (एसटी) 2 महिला 1 पुरुष अशा 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी, ओबीसाठी) 19 महिला 18 पुरुष अशा 37 आणि खुल्या गटासाठी 38 महिला 39 पुरुष अशा 77 जागा अशी वर्गवारी आहे.

अशी आहे आरक्षण सोडत!

प्रभाग क्रमांक 1 – तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 2 – चिखलीगावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी (एससी, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 3 – बो-हाडेवाडी, जाधववाडी (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 4 – मोशी गावठाण, डुडुळगाव, गंधर्वनगरी (ओबीसी महिला,  सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 5 – च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 6 – दिघी, गणेशनगर, बोपखेल( एसटी पुरुष,सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 7 – सँण्डविक कॉलनी, रामनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 8 – भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 9 – धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 10 – इंद्रायणीनगर, लांडेवाडी, शांतीनगर, गव्हाणेवस्ती  (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 11 – गवळीमाथा, बालाजीनगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 12 – घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 13 – मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 14 – यमुनानगर, फुलेनगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 15 – संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 16 – नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर ( एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 17 – वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर( एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 18 – मोरवाडी, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, गांधीनगर, खराळवाडी (एससी महिला, ओबीसी पुरुष,  सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 19 – चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 20 – काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 21 – आकुर्डीगावठाण, गंगानगर, दत्तवाडी (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 22 – ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगर (एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 23 – वाहतूकनगरी, भक्ती-शक्ती, केंद्रीय वसाहत (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 24 – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत (एससी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 25 – वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती (एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 26 – बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 27 – चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह ( ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 28 – केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 29 – भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल (एससी, सर्वसाधारण महिला,
सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 30 – पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभवनगर (ओबीसी महिला,  सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 31 – काळेवाडी, विजयनगर, नढेनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 32 – तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर ( एससी, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 33 – रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर ( ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 34 – बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी ( एससी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 35 – थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगर (एससी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 36 – गणेशनगर, संतोषनगर, पद्मजी पेपर मिल ( ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 37 – ताथवडे, पुनावळे, काळाखडक ( एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 38 – वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्ती (एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 39 – पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर (एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 40 – पिंपळेसौदागर, कुणाल ऑयकॉन, प्लॅनेट मिलेनियम (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 41 – पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती (एससी महिला, एसटी महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 42 – कासारवाडी, फुगेवाडी, कुंदननगर, वल्लभनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 43 – दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगर ( एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 44 – पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क (एससी,  एसटी महिला, सर्वसाधारण महिला)

प्रभाग क्रमांक 45 – नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, गजानन महाराज नगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 46 – जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर (एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

एससी, एसटीचे आरक्षण कायम!

एसीसी, एसटीचे आरक्षण कायम राहणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात  19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14  या प्रभागात महिलांसाठी 11 जागा राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससींसाठी आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी  44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 एसटी समाजातील पुरुषासाठी राखीव झालेला आहे.

https://youtu.be/tWzR084iQww

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.