PCMC Election Chinchwad : चिंचवड विधानसभा मतदारसंघात कशा होतील लढती?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC Election Chinchwad) निवडणुकीसाठी महिलांची आरक्षण सोडत झाल्यानंतर आता संभाव्य उमेदवार कोण असणार, कोण आमने-सामने येणार याबाबत जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभागात संभाव्य कोण उमेदवार असतील. कोणाला लढण्याची संधी मिळणार आहे, याबाबतचा आढावा.

प्रभाग क्रमांक 24 – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेतमध्ये 1 जागा एससी महिला, सर्वसाधरण महिला 1 आणि 1 जागा खुली आहे. बाळासाहेब ओव्हाळ यांची संधी गेली. प्रज्ञा खानोलकर, संगीता भोंडवे, मोरेश्वर शेडगे, बाळासाहेब तरस, गणेश भोंडवे लढू शकतात. प्रभाग क्रमांक 25 – वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्तीत 1 जागा एससी, 1 जागा सर्वसाधारण महिला तर 1 जागा खुली राहील. राजेंद्र साळुंखे, माऊली सुर्यवंशी, सचिन चिंचवडे, मोरेश्वर भोंडवे लढू शकतात.

प्रभाग क्रमांक 26 – बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगरात 1 जागा सर्वसाधारण महिला 2 जागा खुल्या राहणार आहेत. भाऊसाहेब भोईर, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, करुणा चिंचवडे, मोना कुलकर्णी लढू शकतात. प्रभाग क्रमांक 27 – चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह प्रभागत 2 जागा सर्वसाधारण  महिला तर 1 जागा खुली आहे. अश्विनी चिंचवडे, संदीप चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, शमिम पठाण, विजय गावडे येथून लढू (PCMC Election Chinchwad) शकतात.

प्रभाग क्रमांक 28 – केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगरमध्ये 1 जागा सर्वसाधारण महिला तर 2 जागा खुल्या राहतील. सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, शीतल शिंदे, अपर्णा डोके, जयश्री गावडे या विद्यमानांसह अनंत को-हाळे,  लढू शकतात. प्रभाग क्रमांक 31 – काळेवाडी, विजयनगर, नढेनगरमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 2 तर 1 जागा खुली आहे. संतोष कोकणे किंवा विनोद नढे दोघापैकी एकाला माघार घ्यावी लागेल किंवा समोरा-समोर लढावे लागेल. उषा काळे, निता पाडाळे यांना संधी आहे. प्रभाग क्रमांक 32 – तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगरमध्ये 1 जागा एससी, 1 जागा सर्वसाधारण महिला आणि 1 जागा खुली राहील. बाबा त्रिभुवन, सुनीता तापकीर, अनिता तापकीर, चंद्रकांत नखाते, कैलास थोपटे, सविता खुळे येथून लढू शकतात.

प्रभाग क्रमांक 33 – रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगरात 1 जागा सर्वसाधारण महिला तर 2 जागा खुल्या राहतील. या भागात नाना काटे, बापु काटे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे दोघापैकी एक जण या प्रभागात येवू शकतो. खंडु कोकणे, कैलास थोपटे, चंद्रकांत नखातेही या प्रभागातून लढू शकतात. प्रभाग क्रमांक 34 – बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी प्रभागात 1 जागा एससी महिला, 1 सर्वसाधारण महिला आणि 1 खुली राहील. मनीष पवार, विमल जगताप, अभिषेक बारणे येथून लढू शकतात.

प्रभाग क्रमांक 35 – थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगरमध्ये 1 जागा एससी महिला, 1 सर्वसाधारण महिला आणि 1 खुली राहील. सचिन भोसले अडचणीत आले आहेत. झामाबाई बारणे, माया बारणे, निलेश बारणे, सिद्धेश्वर बारणे, प्रवीण बारणे येथून लढू शकतात. प्रभाग क्रमांक 36 – गणेशनगर, संतोषनगर, पद्मजी पेपर मिल प्रभागात सर्वसाधारण महिलांसाठी 2 तर 1 जागा खुली आहे. विश्वजीत बारणे, सिद्धेश्वर बारणे, झामाबाई बारणे या प्रभागातूनही लढू शकतात.

PCMC Election Pimpri : आरक्षण सोडतीनंतर आडाखे बांधण्यास सुरुवात, पिंपरीत कसे असेल चित्र

प्रभाग क्रमांक 37 – ताथवडे, पुनावळे, काळाखडकमध्ये 1 एससी महिला, 1 सर्वसाधारण महिला तर 1 जागा खुली आहे. संदीप पवार, यमुना पवार, चेतन भुजबळ, रेखा दर्शिले येथून लढू शकतात. एससी महिला पडल्याने शेखर ओव्हाळ यांची संधी गेली. प्रभाग क्रमांक 38 – वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्तीत 1 एससी, 1 सर्वसाधारण महिला आणि 1 जागा खुली राहील. राहुल कलाटे, मयुर कलाटे दोघांपैकी एकजणाला थांबावे लागेल किंवा समोरा-समोर यावे लागेल. मयुर यांच्या पत्नी स्वाती कलाटे यांची संधी आहे. अश्विनी वाघमारे यांना पुरुष गटातील लढावे लागेल किंवा त्यांच्या कुटुंबातील एकजण (PCMC Election Chinchwad) लढू शकतो.

प्रभाग क्रमांक 39 – पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगरात 1 एससी, 1 सर्वसाधारण महिला आणि 1 जागा खुली राहील. विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, तुषार कामठे, सचिन साठे, सुजाता नांदगुडे, आरती चोंधे लढू शकतात.  प्रभाग क्रमांक 40 – पिंपळेसौदागर, कुणाल ऑयकॉन, प्लॅनेट मिलेनियममध्ये 2 जागा सर्वसाधारण महिला आणि 1 जागा खुली राहील. नाना काटे, बापु काटे दोघापैकी एकाला प्रभाग बदलावा लागेल किंवा आमने-सामने यावे लागेल. शीतल काटे, निर्मला कुटे यांनी संधी आहे.

PCMC Election Bhosri : आरक्षण सोडतीनंतर भोसरीत कशा असतील लढती?

प्रभाग क्रमांक 41 – पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्तीत 1 एससी महिला, 1 एसटी महिला आणि 1 जागा खुली राहील. उषा मुंढे, शोभा आदियाल, राजू लोखंडे, वैशाली जवळकर, श्याम जगताप तसेच शंकर जगताप देखील येथून लढू शकतात. प्रभाग क्रमांक 44 – पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्कमध्ये 1 एससी, 1 एसटी महिला आणि 1 जागा खुली राहील. माजी महापौर शकुंतला धराडे, राजेंद्र जगताप, शशिकांत कदम, सांगर अंगोळकर किंवा अंबरनाथ कांबळे दोघापैकी एकाला घरी बसावे लागेल. शकंर जगताप देखील येथून लढू शकतात.

प्रभाग क्रमांक 45 – नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, गजानन महाराज नगरात 1 सर्वसाधारण महिला, 2 जागा खुल्या राहतील. नवनाथ जगताप, राजेंद्र राजापुरे, सीमा चौघुले किंवा माधवी राजापुरे तसेच शंकर जगताप या प्रभागातूनही लढू शकतात. तर, शेवटच्या प्रभाग क्रमांक 46 – जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगरमध्ये 4 उमेदवार असणार आहेत. 1 एससी, 2 सर्वसाधारण महिला आणि 1 जागा खुली राहील. महापौर उषा ढोरे महिला प्रवर्गातून तर हर्षल ढोरे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, संतोष ढोरे हे खुल्या जागेसाठी इच्छुक आहेत. पुन्हा आमने-सामने लढण्याशिवाय पर्याय नाही. दोघांना माघार किंवा अपक्ष लढावे लागणार आहे. एससी जागेतून भाजपकडून संतोष कांबळे, शारदा सोनवणे दोघांपैकी एकजण लढू शकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.