PCMC Election 2022: प्रभागरचनेविरुद्ध उच्च न्यायालयात दाद; बुधवारी सुनावणी

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्यामार्फत याचिका

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Pcmc Election ward composition) तयार केलेल्या प्रभागरचनेत अनागोंदी, नियमबाह्य प्रकार झाले आहेत. निवडणूक यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप व दबावाखाली प्रभाग रचना केल्याचा आरोप करत या प्रभाग रचनेच्या विरोधात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी  उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे.

मडिगेरी म्हणाले, की महापालिकेमार्फत प्रभागरचनेचे काम सुरू झाल्यानंतर, तसेच प्रारुप प्रभागरचनेनंतर वारंवार लेखी तक्रारी, हरकती घेऊन देखील महापालिका व राज्य निवडणूक यंत्रणा यांच्याकडून कोणताही न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर महापालिकेच्या प्रभागरचनेबाबत वरिष्ठ अॅड. एस एम घोरवडकर व अॅड. ऋतिक जोशी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. प्रभागरचनेबाबत दाखल याचिकेवर 25 मे 2022 रोजी न्यायधीश पी. डी. नाईक व न्यायधीश अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी महापालिका आयुक्त यांनी हजर राहावे, असे अॅड. ऋतिक जोशी यांनी पिंपरी चिचवड महापालिकेला पूर्ण कागदपत्रांसह कळविले आहे.

Income transfer fee : ‘मिळकत हस्तांतरण फी दरवाढ अवास्तव, आदेश त्वरीत रद्द करा’ – सीमा सावळे

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेमार्फत 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रारुप प्रभाग रचना (Pcmc Election ward composition) प्रसिद्ध केली. प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध होण्याच्या 3 महिन्यापूर्वी म्हणजे 25 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वातील प्रभाग क्रमांक 8 चे तीन भागात चुकीच्या पद्धतीने मोडतोड होणार; तसेच सेक्टर 1 संपूर्ण भाग वगळून नवीन भाग विठ्ठलनगर, लांडेवाडी झोपडपट्टी जोडणार असल्याची शंकावजा तक्रार राज्यपाल तसेच राज्य निवडणूक आयोग, भारत निवडणूक आयोग यांच्याकडे केली होती.

त्याची कोणतीही दखल न घेता व्यक्त केलेल्या संशयाप्रमाणेच प्रभाग क्रमांक 8 मधील सेक्टर 1, गवळीमाथा बाकी सर्व भाग 1 असे याचे तीन तुकड्यात विभाजन केले. तसेच, सेक्टर 1 संपूर्ण भागासह सेक्टर 2 चाही संपूर्ण भाग वगळून नवीन भाग विठ्ठलनगर, लांडेवाडी झोपडपट्टी जोडण्यात आली.

या तक्रारीच्या अनुशंगाने राज्य निवडणूक आयोगाने पत्राद्वारे प्रारुप प्रभागरचनेवर हरकत नोंदविण्याचे लेखी मला कळविले. त्यानुसार प्रारुप प्रभागरचनेवर राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या पुराव्यासह 15 मुद्याच्या आधारे हरकत नोंदविली होती. परंतु, प्रत्यक्षात 13 मे 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम प्रभाग रचनेत ठोस हरकतींची कोणतीही दखल घेतली नसल्याचे स्पष्ट झाले.  या संपूर्ण बाबीवरून महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण यंत्रणेने निवडणुकीसाठीची प्रभाग रचना (Pcmc Election ward composition) प्रचंड दबावाखाली केल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप मडिगेरी यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.