PCMC: नवीन मालमत्ता शोधण्यावर भर; आयुक्तांची माहिती

एमपीसी न्यूज – नवीन आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवड शहरातील ( PCMC) नव्याने निर्माण झालेल्या मालमत्तांची शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. पाण्याचे अवैध नळजोड अधिकृत करुन घेतले जाणार आहेत. त्यांना बिलाचे कक्षेत आणले जाईल. त्यामुळे मालमत्ताकर वाढीपेक्षा नवीन मालमत्ता शोधण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

 

Accident News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारचा विचीत्र अपघात, डिव्हायडरचा रॉड कारच्या आरपार

 

 

 

आयुक्त सिंह म्हणाले, नवीन मालमत्तांचा सर्व्हे केला जाईल. या मालमत्तांना कर कक्षेत आणण्यावर भर दिला जाईल. त्यातून उत्पन्नात वाढ होईल. अवैध नळजोड अधिकृत करण्याचे काम हाती घेतले आहे. पाणी गळती रोखली जाईल. मालमत्ताकर आणि पाणी बिलाचे एकत्रिकरण केले जाणार आहे. कर विभागाच्या माध्यमातूनच पाणी बील वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

 

 

 

आंद्रा धरणातून पहिल्या टप्प्यात पाणी उचलण्यात येणार आहे. चिखलीतील ( PCMC) जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. मार्चअखेरपर्यंत निघोजे बंधा-यांतून पाणी उचलण्यास सुरुवात होईल. रखडलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सकारात्मकपणे प्रयत्न चालू आहेत. शहरवासीयांची पाण्याची गरज आणि मावळातील स्थानिकांचा विचार करुन, त्याची सांगड घालून याबाबतचा निर्णय घेतला जाईल. राज्य शासनासबोत लवकरच बैठक घेवून बंदिस्त जलवाहिनीबाबत मार्ग काढला जाईल, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.