PCMC : सलग दुस-या दिवशी संप सुरुच, पालिकेचे कामकाज बंद

एमपीसी न्यूज – अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. काम नाही, वेतन नाही हे धोरण अनुसरण्यात येईल असा इशारा (PCMC) आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत. सलग दुस-या दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांचा संप सुरु आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज पूर्णपणे बंद आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी मंळवारपासून संपावर आहेत. या संपात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. मंगळवारी महापालिकेचे कामकाज पूर्णपणे बंद होते.

Pune News : चांदणी चौक उड्डाणपुलाच्या कामाचा जिल्हाधिकारी घेणार आढावा

सलग दुस-यादिवशी संप सुरुच आहे. आजही कर्मचारी महापालिकेत आले नाहीत. त्यामुळे पालिकेतील सर्व विभाग बंद आहेत. कर्मचारी आले नसल्याने वरिष्ठ अधिका-यांनाही परत जावे लागले आहे.(PCMC) कार्यालयेच उघडली नाहीत. त्यामुळे अधिका-यांना बसण्यास जागा नव्हती. आज दुस-यादिवशी पालिकेचे कामकाज पूर्णपणे बंद असल्याचे दिसून येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.