PCMC : संप मागे! महापालिकेचे कामकाज पूर्वपदावर

एमपीसी न्यूज – जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरु केलेला (PCMC) संप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचा-यांनी मागे घेतला आहे. काळ्या फिती लावून आज (गुरुवारी) सकाळपासून कामकाज सुरु केले आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर महापालिकेचे कामकाज पूर्वपदावर आले आहे.
जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस संप केला. मंगळवारी मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्याने बुधवारीही बेमुदत संप सुरू होता. दोन दिवस संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे सर्व कामकाज बंद झाले होते.
WPL : रॉयल चॅलेंजर्सने थांबवली पराभवांची मालिका
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी महापालिका सेवेत रुजू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रुजू व्हावे.(PCMC) अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. त्यानुसार पेन्शन लागू असलेले कर्मचारी आज सकाळी कामावर रुजू झाले. त्यानंतर 2005 नंतरचे कर्मचारीही कामावर हजर झाले. त्यामुळे संप संपला असून पालिकेचे कामकाज सुरळीत सुरु झाले आहे.