PCMC : कर्मचाऱ्यांनो ! मराठी व्याकरण शिका
सहाय्यक आयुक्तांच्या कर्मचाऱ्यांना सूचना

एमपीसी न्यूज – मराठी भाषा ही अधिकृत (PCMC) राज्यभाषा असून शासकीय कामामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबत राज्य शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र, तरीदेखील महापालिकेत कर्मचारी मराठी भाषा वापरताना चुका करतात. त्यामुळे कर संकलन व कर आकारणी विभागातील कर्मचाऱ्यांना मराठी व्याकरणाचा अभ्यास करून योग्य भाषा वापरण्याबाबतची सूचना सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली आहे.
शासकीय व्यवहारासाठी मराठी भाषा ही अधिकृत मानली जाते. त्यामुळे शासकीय कार्यालयातील भाषिक व्यवहार हा शुद्ध व नेमक्या शब्दात असणे आवश्यक आहे. याबाबतीत राज्य शासनाकडून अनेकवेळा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
Khadki : स्पीकरचा वाद जीवावर बेतला; अपमानित झाल्याने ज्येष्ठाने संपवले जीवन
भाषेच्या शुद्धतेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असलेली अनास्था चिंताजनक असल्याची खंत व्यक्त करत कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त देशमुख यांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत.
त्यानुसार शासनाने मराठी भाषेच्या वापराबाबत दिलेल्या सूचनांचे कर्मचाऱ्यांनी पालन करावे. तसेच शुद्धलेखनासाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास करावा. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनेकदा तांत्रिक शब्दांना मराठी प्रतिशब्द उपलब्ध नसतात.
तसेच असले तरी ते फारसे प्रचलित नसतात. अशा वेळी मूळ तांत्रिक शब्द सुरूवातीला मराठी भाषेत लिहून कंसामध्ये इंग्रजी शब्द लिहावा. तसेच कार्यालयीन टिपणी किंवा पत्रव्यवहार अशुद्ध भाषेत सादर केल्यास प्रति चुकीला पाच रूपये दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशाराही सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी दिला (PCMC) आहे.