PCMC : निवड होऊन वर्ष झाले पण, पालिकेकडून नियुक्ती मिळेना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC ) वैद्यकीय विभागाअंतर्गत काढलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेची परीक्षा आणि निकाल लागून वर्ष होत आले. तरी, पात्र उमेदवारांना अद्यापही नियुक्ती दिली नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थी शुक्रवारी (दि.19) महापालिकेवर धडकणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची रूग्णालये आणि दवाखान्यांसाठी ‘अ’ ते ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरती करण्यासाठी महापालिकेने 2021 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने 128 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी तब्बल 19 हजार 56 जणांनी अर्ज केले होते. जून 2022 मध्ये ऑनलाइन परीक्षा झाली.

UPSC : यूपीएससीकडून पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

त्यानंतर चार दिवसांनी निकाल लागला. त्यानंतर महिन्याभरात कागदपत्रांची पडताळणी देखील पूर्ण झाली. परंतु, अनेक महिने अंतिम निकाल लागला नव्हता. आता दोन महिन्यांपूर्वी निकाल लागला. पण, अद्यापही पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली नाही. यामध्ये वैद्यकीय विभागाची फॉर्मासिस्ट, एक्सरे टेक्नेशिअन, वैद्यकीय अधिकारी, एएनएम अशी पदे आहेत.

याबाबत एमपीसी न्यूजशी बोलताना रत्नदिप भिसे म्हणाले, महापालिकेची ऑक्टोबर 2021 मध्ये जाहिरात निघाली होती. त्यानंतर जून 2022  मध्ये परीक्षा झाली. चार दिवसांनी निकाल लागला. त्यानंतर महिन्याभरात कागदपत्रांची पडताळणी झाली. अंतिम निकाल लागला विलंब झाला. आता दोन महिन्यांपूर्वी निकाल लागला. पण, अद्यापही नियुक्ती दिली नाही. एका बाजूला वैद्यकीय विभाग हा सर्वात महत्वाचा समजला जातो. तर, दुसरीकडे बेरोजगारीची समस्या युवकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. असे असतानाही निवड होवून देखील नियुक्ती वेळेवर दिली जात नाही. हा उमेदवारांवर अन्याय आहे. त्यामुळे याबाबत शुक्रवारी आयुक्तांना निवेदन देणार (PCMC ) आहोत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.