PCMC : अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी 36 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत नळजोड नियमित (PCMC) करण्याचे काम ठेकेदाराला देण्यात येणार असून त्यासाठी 36 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

महापालिकेने अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी विशेष मोहिम राबविली होती. तीनवेळा या मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली. पण, नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अनधिकृत नळजोड नियमित करण्याचे काम ठेकेदारामार्फत करण्याचा निर्णय घेतला.त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला. निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

शहराचे दोन भाग करुन निविदा काढली जाणार आहे. त्यासाठी 36 कोटी रुपयांचा खर्च (PCMC) अपेक्षित धरला आहे. या कामासाठी ठेकेदाराला सहा महिन्यांची मुदत असणार आहे. ठेकेदार अवैध नळजोड शोधून निळ्या रंगाचे पाईप लावून अधिकृत नळजोड करणार आहे. पाण्याचा मीटर बसविला जाईल. त्याचा खर्च नागरिकांच्या पाणी बिलात समाविष्ट केला जाणार आहे.

Pune : इंद्रायणीतील जलप्रदुषण रोखण्यासाठीच्या उपायोजना कालबद्धरित्या पूर्ण कराव्यात – राजेश देशमुख

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.