PCMC : शहराचे शेवटच्या टोक असलेल्या दापोडीला मुबलक पाणीपुरवठ्यासाठी 70 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे (PCMC) शेवटचे भाग असलेल्या दापोडी आणि सांगवी परिसराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निगडी ते दापोडी या ग्रेडसेपरेटर मार्गावर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यासाठी 70 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

पवना नदीतून 510 एमएलडी, एमआयडीसीचे 30 एमएलडी आणि आंद्रा धरणाचे 50 एमएलडी असे एकूण 590 एमएलडी पाणी सद्यपरिस्थितीत शहराला कमी पडत आहे. शहराचे शेवटचे टोक असलेल्या दापोडी, सांगवी या परिसरापर्यंत पाणी पोहचण्यास विलंब होतो. तसेच, काही वेळा कमी प्रमाणात पाणीपुरवठा होतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी निगडीच्या सेक्‍टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून ते दापोडीपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाकडून एक हजार मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. शेवटच्या भागात जलवाहिनी 600 मिलिमीटर व्यासाची असणार आहे.

Lonikand : गर्भवती महिलेला मारहाण; पोटावर दगड लागल्याने विवाहितेचा गर्भपात

ही जलवाहिनी निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्पाच्या (PCMC) बाजूने सर्व्हिस रस्त्याने दापोडीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 70 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या स्वतंत्र जलवाहिनीमुळे शहराचा शेवटच्या भागातील दापोडी व सांगवी परिसराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.