Pimpri: चोवीस तास पाणीपुरवठा योजना; ठेकेदाराकडून पावणे दोन कोटीचा दंड वसूल

दोन वर्षात केवळ 30 टक्के काम पुर्ण; ठेकेदाराला दिरंगाई भोवली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 40 टक्के भागात 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेच्या कामाची निर्धारीत मुदत संपूनही ठेकेदाराने काम पुर्ण केले नाही. निर्धारित मुदतीत केवळ 30 टक्के काम पुर्ण केले. त्यामुळे कामात दिरंगाई केल्याने महापालिकेने ठेकेदाराकडून तब्बल 1 कोटी 78 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. बिलाच्या रकमेतून ही रक्कम वसूल केली आहे. तसेच उर्वरित काम याच ठेकेदाराकडून प्रभावणीपणे पुर्ण करुन घेतले जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

दिघी, भोसरीगावठाण, मोशी, जय गणेश साम्राज्य, स्पाईन रोड, संभाजीनगर, शाहूनगर, निगडी, यमुनानगर, प्राधिकरण, चिंचवडमधील केशवनगर, प्रेमलोक पार्क, थेरगाव, दत्तनगर, सांगवीच्या काही भागात पहिल्या टप्प्यात 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाची निविदा 217 कोटी रुपयांची होती. परंतु, ठेकेदाराला 207 कोटी रुपयांमध्ये हे काम देण्यात आले होते. कामाची मुदत दोन वर्षांची होती. कामाला सुरुवात 19 जून 2016 मध्ये झाली होती.

त्यानुसार काम 18 जून 2018 ला काम पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, निर्धारित मुदतीत ठेकेदाराकडून काम पुर्ण झाले नाही. दोन वर्षात केवळ 30 टक्के काम पुर्ण केले आहे. त्यामुळे या ठेकेदाराला महापालिकेने दंड आकारणी सुरु केली होती. त्यानुसार अद्यापर्यंत पालिकेने या ठेकेदाराकडून तब्बल 1 कोटी 78 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचबरोबर यापुढील काम त्याच ठेकेदाराकडून प्रभावीपणे करुन घेण्यात येणार आहे. कामात हलगर्जीपणा केल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची तरतूद महापालिकेने ठेवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.