PCMC : घोडकेंकडे आरोग्य विभागाचा तर वायसीएमचा अतिरिक्त पदभार डॉ. मारोती गायकवाड यांच्याकडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अतिरिक्त पदभार जनसंपर्क विभागाचे सहायक आयुक्त रविकिरण घोडके ( PCMC ) यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडील पदभार प्रा. डॉ. मारोती गायकवाड यांच्याकडे दिला आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर हे 24 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत रजेवर गेले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने चारठाणकर यांच्याकडील पदभार जनसंपर्क विभागाचे सहायक आयुक्त घोडके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. घोडके यांनी जनसंपर्क विभागाचा पदभार सांभाळून आरोग्य विभागाचा अतिरिक्त पदभार सांभाळायचा आहे.

Pune Crime News : रस्ता चुकल्याने कंटेनर चालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार; जागीच मृत्यू

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे हे 24 जानेवारीपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांच्याकडील पदभार प्रा. डॉ. मारोती गायकवाड यांच्याकडे ( PCMC ) सोपविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.