मंगळवार, जानेवारी 31, 2023

PCMC : शालेय पोषण आहारात काचा, प्लास्टिक, अळ्या आढळल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वतीने दिल्या जाणा-या शालेय पोषण आहारात काचा, प्लास्टिक, अळ्या आढळून आल्याचा दावा करत याप्रकरणी संबंधित संस्थेवर कारवाई केली जात नाही. शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत कारवाईस टाळाटाळ करतात. त्यांना निलंबित करावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, महापालिका शाळांमधील गोर-गरिब विद्यार्थ्यांना शासन अनुदानातून शालेय पोषण आहार पुरविला जातो. मात्र, या शालेय पोषण आहारात दिल्या जाणा-या खिचडीत चक्क काचा, प्लास्टिकचे तुकडे आणि आळ्या आढळून आल्याचे प्रकार घडले आहेत. शाळांच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारींमुळे स्वयंरोजगार संस्थेकडून पुरविलेल्या भातात चक्क केस, आळ्यांसह काचेचा, प्लास्टिकचा तुकडा आढळून आल्याची ही गंभीर बाब समोर आणली.

PCMC News: भाटनगर येथील मैला शुद्धीकरण केंद्राचे नुतनीकरण, 31 कोटींचा खर्च

याच संस्थेच्या शालेय पोषण आहाराबाबत वेगवेगळ्या सात शाळांमधून तक्रारी प्राप्त झाल्या. तरी देखील शिक्षण विभाग आणि या विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी कोणतीही कारवाई (PCMC) केली नाही. त्यांनी दिलेल्या नोटिसांना देखील संबंधित संस्थेने जुमानले नाही. त्यांनी दिलेल्या नोटीसांमध्ये शालेय पोषण आहारात आळ्या, काचा व प्लास्टिकचे तुकडे आढळल्याचा उल्लेख आहे. मात्र, उपायुक्त खोत यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या संस्थेच्या शालेय पोषण आहाराबाबत पहिली तक्रार 25 ऑगस्ट 2022 रोजी प्राप्त झाली होती. त्यानंतर वारंवार शालेय पोषण आहाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. तरीही शिक्षण विभागाच्या उपायुक्तांनी कारवाई न करता संबंधित संस्थेला पाठिशी घातल्याचे दिसते.

Latest news
Related news