Pimpri : महापालिकेतर्फे प्र. के. अत्रे यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आचार्य प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव व उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

आचार्य अत्रे रंगमदिर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राऊत, प्रा.शशिकांत इनामदार, जनसंपर्क विभागाचे सोमनाथ साबळे, आचार्य अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक विजय घावटे, रोहन लांडगे, अजीत म्हसवडे, विलास शिंदे, सुधीर पंडीत, आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.